रतन टाटा यांनीच सांगितला होता, त्यांच्या ‘अधूऱ्या प्रेम कहानी’चा तो किस्सा, आजीने भारतात बोलवले अन्…

| Updated on: Oct 10, 2024 | 3:41 PM

Ratan Tata Incomplete Love Story: रतन टाटा यांना वाटले ते भारतात परतल्यावर ती युवतीसुद्धा भारतात येईल. परंतु त्यानंतर 1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरु झाले. त्यामुळे त्या मुलीचे आई-वडील तिला भारतात पाठवण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांचे नाते कायमस्वरुपी तुटले.

रतन टाटा यांनीच सांगितला होता, त्यांच्या अधूऱ्या प्रेम कहानीचा तो किस्सा, आजीने भारतात बोलवले अन्...
रतन टाटा यांनी लग्न का केले नाही?
Follow us on

Ratan Tata Incomplete Love Story: भारतातील युवकांचे लिजेंड असणारे उद्योगपती रतन टाटा यांनी लग्नच केले नव्हते. त्यांचे खासगी जीवन तितकेच रहस्यमय राहिले आहे. त्यांनी त्याबाबत कधीच वक्तव्य केले नाही. परंतु त्यांनी प्रेम केले होते. त्यांचे हे प्रेम यशस्वी होऊ शकले नाही. त्यांच्या या ‘प्रेम कहानी’चा किस्सा स्वत: रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितला होता. सिमी ग्रेवाल यांना 1997 मध्ये दिलेल्या मुलाखतीत रतन टाटा यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. तसेच लग्न का होऊ शकले नाही? ते सांगितले. 1960 मध्ये आजीने भारतात बोलवले नसते तर रतन टाटा यांचे लग्न झाले असते, असे त्या मुलाखतीवरुन वाटते.

अमेरिकेत झाले होते प्रेम…

रतन टाटा यांनी सिमी ग्रेवाल यांना मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, 1960 मध्ये ते अमेरिकेत शिक्षणासाठी गेले होते. त्यानंतर त्याच ठिकाणी नोकरीसुद्धा करु लागले. त्यावेळी त्यांची भेट लॉस एंजेलिसमध्ये एका युवतीशी झाली. त्या युवतीसोबत मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. ते त्या युवतीशी लग्नही करणार होते. त्याचवेळी त्यांची आजी नवाजबाई टाटा यांनी त्यांना भारतात बोलवून घेतले. आजीने बोलवल्यामुळे ते ही भारतात आले.

आई-वडिलांचा होणार होता घटस्फोट

रतन टाटा यांचे बालपण आजी नवाजबाई यांच्या सहवासात गेले. कारण ते लहान असतानाच आई वेगळी राहत होती. 1960 मध्ये आजीने जेव्हा त्यांना भारतात बोलवले तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट होणार होता. त्यावेळी त्यांचा भाऊ खूप लहान होता. त्यामुळे ते भारतात परतले.

हे सुद्धा वाचा

भारत-चीन युद्धामुळे लग्नच झाले नाही…

रतन टाटा यांना वाटले ते भारतात परतल्यावर ती युवतीसुद्धा भारतात येईल. परंतु त्यानंतर 1962 मध्ये भारत-चीन युद्ध सुरु झाले. त्यामुळे त्या मुलीचे आई-वडील तिला भारतात पाठवण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्यांचे नाते कायमस्वरुपी तुटले. त्यांची ‘प्रेम कहाणी अधुरी’च राहिली. रतन टाटा यांच्या अमेरिकेतील प्रेम कथेला विराम मिळाला होता. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आणखी एक तरुणी आली होती. पण तिला जीवनसाथी करावे, अशी साद त्यांचे मन त्यांना देत नव्हते, अशी प्रांजळ कबुली रतन टाटा यांनी दिली होती.