मुंबई : अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती दरम्यान देशभरासह मुंबईत देखील सुका मेव्याचे भाव अचानक गगनाला भिडू लागले आहेत. मुंबईतील होलसेल मार्केटमध्ये देखील ग्राहक अक्रोड, बदाम आणि इतर वस्तू खरेदी करतो, परंतु आता दर वाढले आहेत कारण बहुतेक मार्केटमध्ये सुकामेवा अफगाणिस्तानातून येत असतो.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा परिणाम आता भारतीय बाजारावरही होत आहे. मुंबईत सुक्या मेव्याचे भाव वाढले आहेत. अफगाणिस्तानात बदल झाल्यानंतर मुंबईत बदामांची किंमत 680 होती, आता बदाम 1050 रुपये किलोग्रॅम झाले आहेत. याशिवाय बाजारात काजू, पिस्ताच्या किंमतीही वाढल्या आहेत. येत्या काही दिवसात आणखी भाव वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
अफगाणिस्तानात तालिबाने सरकार हातात घेतल्यानंतर देशातील अनेक भागात ड्राय फ्रूटचे दर कृत्रिमरित्या वाढवण्यास सुरुवात झालीये. सध्या देशात अफगाणिस्तानातून येणाऱ्या ड्राय फ्रूटचा पुरेसा साठा शिल्लक आहे. त्यामुळे दर सध्या तरी स्थिर आहेत. परंतु पुढील काही दिवसात केंद्र सरकारच्या धोरणानुसार दर वाढतील की नाहीत हे सांगता येणार नाही. परंतु पुढील काळात हे दर 10-15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करतायेत. यासंदर्भात मार्केट यार्डातील ड्रायफुटचे व्यापारी नविन गोयल यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी दरांबाबत माहिती दिली.