मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण; किरकोळ बाजारात मात्र महागाई कायम

| Updated on: Nov 10, 2020 | 12:40 AM

नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. त्यानंतर मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, आता भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 596 गाड्यांची आवक झाली आणि भाज्यांच्या दरात घसरण सुरु आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती वाढल्या […]

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण; किरकोळ बाजारात मात्र महागाई कायम
एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण
Follow us on

नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं. त्यानंतर मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, आता भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 596 गाड्यांची आवक झाली आणि भाज्यांच्या दरात घसरण सुरु आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती वाढल्या होत्या. आता बाजारात 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी 10 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे (Rate of Vegetables decreases in APMC but not in Market).

एपीएमसीत दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकला जात आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 596 गाड्यांची आवक झाली. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या बाजारात फ्लॉवर 10 ते 20 रुपये, कोबी 10 ते 25 रुपये, मिरची 30 ते 40 रुपये, काकडी 8 ते 14 रुपये किलो विकली जात आहे. टोमॅटो 20 ते 30 रुपये, वांगी 35 ते 40 रुपये तर कोथिंबीर 15 ते 25 रुपये, मेथी 10 ते 20 रुपये, पालक 6 ते 10 रुपये दराने विकली जात आहे.

भाजीपाला आणि दर

फरसबी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
फ्लॉवर 10 ते 12 रुपये प्रतिकिलो
गवार 50 ते 60 रुपये प्रतिकिलो
गाजर 35 ते 40 रुपये प्रतिकिलो
भेंडी 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
कोबी 10 ते 12 रुपये प्रतिकिलो
मिरची 40 ते 50 रुपये प्रतिकिलो
टोमॅटो 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
काकडी 8 ते 15 रुपये प्रतिकिलो
वांगी 35 ते 40 रुपये प्रतिकिलो
कोथिंबीर 15 ते 25 रुपये प्रतिकिलो

हेही वाचा :

Food | मेंदूवरचा ताण कमी करा, ‘या’ भाज्या खा आणि स्मरण शक्ती वाढवा!

पाऊस रखडल्याने भाज्या कडाडल्या, नाशिकमधील भाज्यांचे दर गगनाला

Rate of Vegetables decreases in APMC but not in Market