रवी राणा-बच्चू कडू वाद संपला, तुम्ही नका सुरू ठेऊ, बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण

| Updated on: Nov 03, 2022 | 8:57 PM

हजार कोटी रुपये दिव्यांगांना मिळतात. हे मी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे.

रवी राणा-बच्चू कडू वाद संपला, तुम्ही नका सुरू ठेऊ, बच्चू कडू यांचं स्पष्टीकरण
बच्चू कडू यांनी कारण सांगितलं
Image Credit source: tv 9
Follow us on

मुंबई : आमदार बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकारांशी दिलखुलास चर्चा केली. बच्चू कडू म्हणाले, काल रवी राणा यांनी दोन स्टेटमेंट केल्या. रवी राणाजी तीन वाजता बोलले, आमचा वाद मिटला. असं त्यांनी म्हटलं. पण, तुम्ही ते जोडे मारायचं नि अंदर मारायचं घेतलं. काय दाखवायचं हे तुमच्यावर ठरलेलं आहे. चागंली गोष्ट आहे ती जास्त दाखवा, असा सल्ला कडू यांनी मीडियाला दिला.

बच्चू कडू म्हणाले, मीडियात हा बदल करणं गरजेचं आहे. मी काय बोललो, सगळ्या तालुका प्रमुखांनी एक शाळा दत्तक घेतली पाहिजे. ती आदर्श शाळा बनली पाहिजे. अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाल्यानंतर शाळा चांगली करतात. प्रहारच्या कार्यकर्त्यानं जिल्हा परिषदेची एक शाळा चांगली केली पाहिजे.

मंत्री पदाचा विषय नाही. तु्म्ही आता संपादक होईल का, असा प्रश्न विचारल्यास तुम्हाला झोंबणार नाही का. असं नसतं ते. राज्याच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित येऊ. काही सूचना तुम्ही दिल्या पाहिजे. कारण तुम्ही लोकांमध्ये राहतो, असंही ते म्हणाले.

मी राज्यमंत्री होतो जलसंपदा विभागाचा. माझ्या जिल्ह्यात, जिल्हा रुग्णालय आणला. २०० कोटींचा प्रकल्प मंजूर केला. पण, ही ब्रेकिंग न्यूज नाही होत ना. म्हणून तुम्ही ते छापत नाही. असा वांदा होतो.

हजार कोटी रुपये दिव्यांगांना मिळतात. हे मी केलेल्या आंदोलनाचा परिणाम आहे. मतदारसंघाकडं लक्ष ठेवावं लागतं. सत्तेत गेलो. मंत्रिपद मिळालं. सत्ता पलटली. विकासकामाचं अर्धवट प्रकल्प राहिले असते. विकासासाठी गेलो तर खोके घेऊन गेलो, असं म्हणता. मीडियावर आरोप होत नाही का, असा सवालही त्यांनी केला.