मुंबई | 25 नोव्हेंबर 2023 : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य आणि पश्चिम मार्ग जेथे एकत्र येतात त्या दादर रेल्वे स्थानकातील मध्य रेल्वेच्या हद्दीतील स्थानकातील फलाट क्रमांक बदलण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील स्थानकातील फलाट क्रमांक 1 आता फलाट क्रमांक 8 होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांकात कोणताही बदल होणार नाही. फलाट क्रमांक 2 बंद करून फलाट क्रमांक एकचा विस्तार करण्यात आला आहे. येत्या 9 डिसेंबरपासून हा बदल करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकाचे सुसूत्रीकरण करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 1 आता फलाट क्रमांक आठ होणार आहे. तर तेथून पुढे मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांकाची गणना होणार आहे. अर्थात सध्याचा फलाट क्रमांक 2 अस्तित्वात नसणार आहे. तर मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 3 ला आता फलाट क्रमांक 9 , फलाट क्रमांक 4 ला आता फलाट क्रमांक 10, फलाट क्रमांक पाचला 11, सहाला 12, सातला 13 आणि आठला फलाट क्रमांक 14 असे क्रमांक देण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील फलाट क्रमांकात कोणताही बदल होणार नाही.
दादर नावाचे एकच स्थानक मध्य आणि पश्चिम मार्गावर खेटून असल्याने मुंबईत नवीन आलेल्या प्रवाशांचा गोंधळ होत असतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेला लागून असलेल्या मध्य रेल्वेच्या फलाटांना 8 ते 14 असे नवीन क्रमांक देण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेतून पश्चिम रेल्वेवर इंटरचेंज करताना प्रवाशांचा गोंधळ होत असता त्यामुळे सिक्वल नंबर देण्यात येणार आहेत.
दादर स्थानकात एकूण 15 फलाट आहेत. त्यातील टर्मिनल फलाटासह ( लांब पल्ल्याच्या गाड्यासाठीचा ) 8 फलाट मध्य रेल्वेच्या हद्दीत आहेत. सात फलाट पश्चिम रेल्वेच्या हद्दीत आहेत. दादर स्थानकांतील एकाच क्रमांकाचे दोन फलाट असल्याने नवीन प्रवाशांचा गोंधळ होत असतो. त्यासाठी हा बदल करण्यात आला असून येत्या 9 डिसेंबर पासून हा बदल प्रत्यक्षात लागू होणार आहे.