मुंबई : सत्ताधारी पक्षाच्या 60 आमदारांचा दरमहा खर्च हा 12 कोटी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडलीय. राज्यातील 60 आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला 144 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. तसेच राज्यातील 12 खासदारांचा सुरक्षेवर दर महिन्याला अडीच कोटी रुपये खर्च होत आहेत. तर वर्षाला दीडशे कोटी रुपये खर्च होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय.
विधी मंडळाच्या अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर रोहित पवार यांनी सत्ताधारी आमदारांच्या खर्चाचा आढावाच ट्वीटद्वारे मांडलाय.
रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्वीट केलाय. या व्हिडीओत धनंजय मुंडे सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.
राज्यात एकाच गटाच्या ४० आमदारांसह सत्ताधारी पक्षाच्या सुमारे ६० आमदारांच्या Y+ सुरक्षेचा खर्च दरमहा १२ कोटी म्हणजे वर्षाचा १४४ कोटी होतोय, तर १२ खासदारांच्या सुरक्षेचा खर्च दरमहा सुमारे अडीच कोटी असा वर्षाचा एकूण खर्च सुमारे दिडशे कोटी होतो. pic.twitter.com/Kitsw309Y0
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 1, 2023
“कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत बोलत असताना सत्ता पक्षातील जवळजवळ 50 ते 60 आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा लागत असेल तर या राज्यात खरंच कायदा व सुव्यवस्था चांगली आहे का?”, असा प्रश्न धनंजय मुंडे सभागृहात उपस्थित केलाय.