मुंबईकर ग्रेटच, रशियन तरुणीने केले भरभरुन कौतूक, मुंबई लोकलमधील व्हिडिओ तुफान व्हायरल

| Updated on: Aug 19, 2024 | 8:35 AM

चुगुरोवा हिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. ८०हजारांपेक्षा जास्त लोकांनी त्या व्हिडिओला लाईक केले आहे. शेकडो युजरने त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटकातील मंगळूर येथील एका युजरने तर आपल्या शहरात तिला बोलवले

मुंबईकर ग्रेटच, रशियन तरुणीने केले भरभरुन कौतूक, मुंबई लोकलमधील व्हिडिओ तुफान व्हायरल
रशियामधील मेरी चुगुरोवा
Follow us on

मुंबईतील लोकल प्रवास एक दिव्यच आहे. रोज लाखोंच्या संख्येने मुंबईकर लोकलमधून प्रवास करतात. मुंबईकरांना गर्दी, रेटारेटी, कधीतरी होणारी बाचावाची नेहमीच झाली आहे. परंतु मुंबईकर तितकेच प्रेमळ आहे. महिलांशी नेहमी आदराने वागतात. महिलांचा सन्मान करतात, असे कौतूक रशियन युवतीने केले आहे. प्रत्यक्ष मुंबई लोकलमधून प्रवास करुन, लोकांची संवाद साधून तिने मुंबई लोकल अन् मुंबईकरांसंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसिद्ध ब्लॉगर असलेल्या या युवतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुंबई लोकलाच व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओला जगभरातील लाखो लोकांनी पाहिले आहे. हजारो जणांनी कमेंटही केल्या आहेत.

मुंबई लोकलमधून प्रवास

रशियामधील मेरी चुगुरोवा प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर आणि एक व्हिडिओ क्रिएटर आहे. तिचे ३६ लाखांपेक्षा जास्त फोलोअर्स आहे. ती ब्लॉगिंग करण्यासाठी भारतात आली. गोव्यामध्ये पोहचल्यावर तिला मुंबईतील लोकल ट्रेनसंदर्भात माहिती मिळाली. मुंबईत एक लोकलमधून एकाच वेळी हजारो जण प्रवास करतात, लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते, असे तिला सांगण्यात आले. मग तिची उत्सुक्ता जागी झाली. तिने सरळ मुंबई गाठले.

हे सुद्धा वाचा

हिंदीतून साधला मुंबईकरांशी संवाद

मुंबईत आल्यावर मुंबई लोकलमध्ये प्रवास केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. लोकल आणि मुंबईकरांचा आलेला अनुभव तिने शेअर केला. लोकलमध्ये गेल्यावर लोकलमधील प्रवाशांनी तिच्याशी प्रेमाने संवाद साधला. लोकलमध्ये तिला बसण्यासाठी जागा दिली. त्यावेळी तिने अनेक मुंबईकरांशी संवाद साधला. काही जणांशी इंग्रजीत तर काही जणांशी हिंदी बोलताना ती दिसत आहे. प्रत्येकाने तिच्याशी आपुलकीने संवाद साधत माहिती दिली. मुंबईकरांप्रमाणे दरवाज्याजवळ लटकून प्रवास करण्याचा अनुभव तिने घेतला. तिने हा सर्व प्रकार आपल्या सोशल मीडियावर शेअर केला.

व्हिडिओ प्रचंड व्हायरल

चुगुरोवा हिचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. ८०हजारांपेक्षा जास्त लोकांनी त्या व्हिडिओला लाईक केले आहे. शेकडो युजरने त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटकातील मंगळूर येथील एका युजरने तर आपल्या शहरात तिला बोलवले. या शहरात तुम्हाला संस्कृती अन् आदरतिथ्य दिसणार असल्याचे म्हटले. दुसऱ्या युजरने नार्थ इस्ट इंडियामधील सौदर्यं पाहण्यासाठी आमंत्रण दिले आहे. हा व्हिडिओ अनेकांनी शेअरसुद्धा केला आहे.