मुंबई: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्याशी दोन तास चर्चा केल्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे अखेर पोलीस मुख्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र, त्यांचे चेहरा पडलेला. त्यांची बॉडीलँग्वेज खूप काही सांगत होती. (sachin waze’s first reaction after transfer)
आज दुपारीच सचिन वाझे पोलीस मुख्यालयात आले होते. मुख्यालयात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा सुरू होती. ही खलबतं सुरू असतानाच वाझे यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घोषणा केली. त्यामुळे या बैठकीत या मुद्दयावरही चर्चा करण्यात आलं. त्यांना कोणत्या विभागात पाठवायचं यावरही चर्चा करण्यात आली. तसेच वाझे यांच्याकडे सध्या असलेली प्रकरणे कोणती आहेत आणि ती कुणाकडे द्यायची यावरही चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच मनसुख हिरेन प्रकरणात जे आरोप करण्यात आले आहेत आणि जे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मीडियाचा गरडा आणि मौन
दोन तासांच्या या खलबतानंतर वाझे हे पोलीस मुख्यालयातून बाहेर आले. वाझे येताच त्यांना मीडियाने गराडा घातला. वाझे यांनी तोंडाला मास्क लावला होता. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावरून आणि एकंदरीत देहबोलीवरून वाझे हे नर्व्हस असल्याचं दिसून येत होतं. या बैठकीत बऱ्याच गोष्टी त्यांच्या मनाविरुद्ध घडल्याचंही दिसून येत होतं. शिवाय हे प्रकरण अंगाशी येणार असल्याचं त्यांच्या एकंदरीत देहबोलीवरून दिसून येत होतं. नेहमी मीडियाशी बोलणारे आणि कालपर्यंत मीडियाला सामोरे जाणारे वाझे यांनी आज मीडियाशी बोलण्यास नकार दिला. बैठकीत काय झालं?, तुम्ही राजीनामा देणार आहात का? तुमची बदली करण्यात आली आहे, त्यावर तुमचं काय मत आहे? हिरेन प्रकरणावर तुम्हाला काही बोलायचं आहे का? विरोधी पक्षाच्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे?, असा प्रश्नांचा भडीमार त्यांच्यावर करण्यात आला. त्यावर थँक्यू… थँक्यू… असं म्हणत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. फक्त माझं अधिकृत स्टेटमेंट मी लवकरच देणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
वाझे काय बोलणार?
येत्या एक ते दोन तासात वाझे त्यांची भूमिका मांडणार आहेत. त्यात ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. वाझे पत्रकार परिषद घेणार की एक स्टेटमेंट जारी करतील यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. हिरेन यांच्या गाडीबाबत वाझे काय खुलासा करणार? हिरेन यांना जामिनावर सोडण्याचा सल्ला का दिला? हिरेन यांची वकिलाशी भेट घालून का दिली? हिरेन यांना गुन्हा कबूल करण्यासाठी का सांगितले? सुरुवातीला हिरेन यांना ओळखत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं, त्यावर काय उत्तर देणार? आणि वाझे यांनी माझ्या पतीची हत्या केल्याचा माझा संशय आहे, असं विमला हिरेन म्हणाल्या आहेत, या आरोपवर ते कसं उत्तर देतात? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sachin waze’s first reaction after transfer)
देशमुख काय म्हणाले?
हिरेन मनुसख प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतूनहटवण्याचा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. हिरेन प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरु आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत. एटीएस याबाबत कोणालाही पाठिशी घालणार नाही. सचिन वझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन देशमुख यांनी दिले. (sachin waze’s first reaction after transfer)
Maharashtra Budget 2021 LIVE : महाराष्ट्र अर्थसकंल्पीय अधिवेशन 2021 लाईव्ह https://t.co/kgNZb4EPhu
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: ‘हमारा दौर फिरसे आयेगा…’; फडणवीसांनंतर अधिवेशनाचा आखाडा कुणी गाजवला?
Breaking | तुम इतना क्यूँ मुस्करा रहे हो – अनिल देशमुखांची मुनगंटीवारांवर शायरीतून टोलेबाजी
Sachin Vaze transferred : सचिन वाझेंना क्राईम ब्रॅचमधून हटवलं, ठाकरे सरकार पुन्हा बॅकफूटवर
(sachin waze’s first reaction after transfer)