पतंजलीच्या कोरोनीलच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही; राज्य सरकारचा रामदेव बाबांना झटका

| Updated on: Feb 23, 2021 | 7:23 PM

योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना व्हायरसवरचं अधिकृत तथा प्रमाणित औषध बाजारात आलं आहे. (Sale of Coronil won't be allowed in Maharashtra without certification, says Anil Deshmukh)

पतंजलीच्या कोरोनीलच्या विक्रीस महाराष्ट्रात परवानगी नाही; राज्य सरकारचा रामदेव बाबांना झटका
Follow us on

मुंबई: योगगुरु रामदेव बाबा यांचं कोरोना व्हायरसवरचं अधिकृत तथा प्रमाणित औषध बाजारात आलं आहे. कोरोनील असं या औषधाचं नाव असून राज्य सरकारने मात्र या औषधाला महाराष्ट्रात विक्रीस मनाई केली आहे. त्यामुळे रामदेव बाबा यांना मोठा झटका लागला आहे. (Sale of Coronil won’t be allowed in Maharashtra without certification, says Anil Deshmukh)

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून रामदेव बाबांना मोठा झटका दिला आहे. पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले असून जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही, असं सांगतानाच जागतिक आरोग्य संघटना आणि आयएमए व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे रामदेव बाबांची चांगलीच कोंडी झाली आहे.

गडकरींच्या उपस्थितीत लॉन्चिंग

रामदेव बाबांनी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कालच कोरोनील या औषधाचं लाँचिंग केलं. “गर्वाचा क्षण…. पतंजलीद्वारे कोव्हिड 19 च्या करिता पहिलं प्रमाणित औषध सादर करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे”, असं पतंजली आयुर्वेदने ट्विट करुन म्हटलं आहे. आम्ही योग आणि आयुर्वेद यांना समांतर पातळीवर पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. कोरोनिल कोट्यवधी लोकांना जीवन देतं आहे. आता वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे आम्ही लोकांना ज्या शंका होत्या त्या दूर केल्या आहेत, असं पतंजलीने म्हटलं आहे.

हू आणि आयएमएचा आक्षेप

या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) प्रमाणपत्र मिळाल्याचं म्हटलं. त्यानंतर थेट WHO नेच आपण अशा कोणत्याही पारंपारिक/आयुर्वेदीक औषधाची तपासणी केलेली नाही आणि प्रमाणपत्र दिलेलं नाही असं स्पष्ट केलं. याशिवाय इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) देखील रामदेव बाबांच्या या दाव्यावर आक्षेप घेतला. तसेच पतंजलीचं औषध कोरोनापासून संरक्षण करत असेल तर मग कोरोना लसीकरणावर 35 हजार कोटी रुपयांचा खर्च कशासाठी असा प्रश्न विचारलाय. कोरोनीलवरुन झालेला वाद वाढताना पाहून पतंजलीने यावर स्पष्टीकरण दिलंय. पतंजलीचे आचार्य बालक्रिष्ण म्हणाले, “आम्ही काही गोष्टी स्पष्ट करु इच्छितो. आमच्या औषधाला मिळालेलं प्रमाणपत्र जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेलं नाही. हे प्रमाणपत्र भारत सरकारच्या विभागाने दिलं आहे. WHO नं आमच्या औषधाला मंजूरी दिलेली नाही किंवा नाकारलेलं देखील नाही. WHO जगभरातील लोकांचं चांगलं आरोग्य सांभाळण्यासाठी काम करते.” (Sale of Coronil won’t be allowed in Maharashtra without certification, says Anil Deshmukh)

 

संबंधित बातम्या:

बाबा रामदेवचं कोरोना औषधही बाजारात, लॉचिंगला गडकरी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री !

पतंजलीच्या औषधाने कोरोना बरा होत नाही : अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

Coronil | महाराष्ट्रात नकली औषधांच्या विक्रीला परवानगी नाही, गृहमंत्र्यांचा रामदेव बाबांना थेट इशारा

(Sale of Coronil won’t be allowed in Maharashtra without certification, says Anil Deshmukh)