राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमान खानकडून खंडणीची मागणी होत आहे. आता सलमान खान हिची बहीण अर्पिताने तिचे वांद्रे येथील घर विकल्याची बातमी आली आहे. ती वांद्रे येथून वरळीत शिफ्ट होत आहे. तिला या घरासाठी चांगली रक्कम मिळाली आहे.
सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि मेहुणा आयुष शर्मा यांनी त्यांचे वांद्रा येथील अलिशान घर विकले आहे. त्यांना या घरासाठी चांगली रक्कम मिळाली आहे. ‘peepingmoon’ च्या रिपोर्टनुसार, सलमान खानची बहीण अर्पिताचे वांद्रा येथे 1750 स्केअर फुटाचे घर आहे. ते घर 22 कोटी रुपयांना विकले आहे. आता ते नवीन घरात शिफ्ट होत आहेत. त्यांचे नवीन घर वरळीमध्ये आहे. आता शर्मा कुटुंब लवकरच नवीन घरात शिफ्ट होणार आहे.
आयुष शर्मा आणि अर्पिता खानचे घर चांगलेच भव्य आहे. त्यात खूप मोठी जागा आहे. एकूण 1750 स्केअर फुटचे ते घर आहे. हे घर अर्पिता हिच्या जीवनातील अनेक प्रसंगांचे साक्षीदार होते. तिचे दोन्ही मुले याच घरात जन्माला आली होती. अर्पिता खान हे घर 10 कोटी रुपयांत घेतले होते. 4 फेब्रुवारी 2022 रोजी त्यासाठी स्टँप ड्यूटी भरली होती. हे घर तिला सलमान खानने गिफ्ट दिले होते. त्यानंतर त्या घराचे फोटो अर्पिता आणि आयुष यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.
सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर त्याची सुरक्षा चर्चेत आहे. सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या मोबाइल क्रमांकावर हा मेसेज मिळाला आहे. त्यानंतर सलमान खानला Y+ सिक्योरिटी दिली गेली आहे. तो सध्या बिग बॉस 18 ची शुटींग करत आहे.