Marathi News Maharashtra Mumbai Sameer Wankhede gets clean chit from Caste scrutiny committee Wankhede wasn't a Muslim by birth they belonged to Mahar 37 Scheduled Caste
Sameer Wankhede : समीर वानखेडे दलितच, त्यांच्या वडिलांनी अन् त्यांनी कधीही मुस्लीम धर्म स्विकारला नव्हता,सरकार बदलताच जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट
मुंबई : एनसीबी मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट मिळाली आहे. समीर वानखेडे जन्माने मुस्लिम नव्हते. त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला, हे सिद्ध झालेलं नाही. पण ते महार-37 अनुसूचित होते, हे सिद्ध झालं आहे, असं जात पडताळणी समितीच्या अहवालात (Cast certificate issue) म्हणण्यात आलं आहे. सध्या राज्यात सत्तांतर झालंय. उद्धव ठाकरे यांच्या हातून सत्ता निसटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. या सगळ्यात मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. समीर वानखेडे यांती जात नेमकी कुठली, ते मुस्लीम आहेत की दलित याविषयी महाविकास आघाडी सरकारच्या काळात बरेच तर्क लावण्यात आले. नवाब मलिक यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. पण आता वानखेडेंना क्लिनचिट मिळाली आहे.
Caste scrutiny committee gives clean chit to ex-NCB Zonal Director Sameer Wankhede. The order reads that Wankhede wasn’t a Muslim by birth; also states that it’s not proven that Wankhede&his father converted to Islam but it’s proven that they belonged to Mahar -37 Scheduled Caste pic.twitter.com/XcOEcKvB8d
समीर वानखेडे यांनी खोटं जात प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवल्याचा आरोप तत्कालिन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. पण त्यांनी दलित असल्याचं प्रमाण पत्र दाखवत आरक्षणाचा गैरफायदा घेत नोकरी मिळवल्याचं मलिक म्हणाले होते. पण अता वानखेडे यांना क्लिनचीट मिळाली आहे.
Sameer Wankhede Caste is already challenged by me in High court, in Writ Petition No WPL/26957/2021, We had no much expectations from Caste Scrutiny Committee, have faith in High Court @ANI @TV9Marathi @DailyMirror @PTI_News pic.twitter.com/qHIjHrbdFl
मुंबई जिल्हा जात पडताळणी समितीने समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी केली होती. समीर वानखेडे यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचीही पाहणी करण्यात आलेली होती. या सर्व पडताळणीनंतर समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचं जात पडताळणी समितीला आढळलं होतं. यामुळे त्यांनी 29 एप्रिल रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली होती. समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र जप्त किंवा रद्द का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस समीन वानखेडे यांना पाठवण्यात आलेली. आता त्यांना जात पडताळणी समितीकडून क्लीनचिट मिळाली आहे.