मुंबई: किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) पवईतील पेरूबाग (powai perunaugh) येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे 300 ते 400 कोटींचा घोटाळा केला आहे. त्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आहेत. एक दोन नाही ट्रकभरून कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ही सर्व कागदपत्रं मी आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार आहे. तसेच आता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भेटायला जात असून त्यांच्याकडेही ही कागदपत्रे देणार आहे, असं सांगतानाच चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी दिला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला आहे. सोमय्यांची एकूण 211 प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. त्यांनी एकूण सात साडेसात हजार कोटींचा हा घोटाळा केला आहे. त्यांनी खुशाल माझ्याविरोधात कोर्टात जावं, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे.
महाआयटी घोटाळ्यातील लोकांना पळवून लावलं आहे. एवढा मोठा घोटाळा आहे. या लोकांना मेहूल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याप्रमाणे पळवून लावलं आहे. महाआयटी घोटाळ्यातील काही प्रमुख लोकांना पळवून लावल्याची माझी माहिती आहे. अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू. 25 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. त्याचे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. ईडी ऐकत असेल तर मी पुन्हा सांगत आहे. आम्ही हा घोटाळा बाहेर काढणार होतो, तेव्हाच ते पळून जाण्याच्या तयारीत होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
मी जुहूच्या प्लॉटबाबत बोललो होतो. तेही बाहेर येईल. पवईचे मला भेटले. किरीट सोमय्यांच्या हातात चप्पल आहे. तेच स्वत:ला चप्पलेने मारतील. महाराष्ट्रातील लोक त्याची धिंड काढतील. तो पुढे लोकं मागे, तो पुढे लोक मागे असं चित्रं निर्माण होईल. कपडे काढून त्याची धिंड काढणार आहे, असा इशाराही त्यांनी केला.
पेरुबाग पास्कोली येथे 138 एकरचा भूखंड आहे. त्याने साफ केला. पुनर्वसनाच्या नावाखाली 433 बोगस लोकांना आत घुसवले. किरीट सोमय्यांच्या एजंटांनी या पुनर्वसन प्रकल्पात बोगस लोकांना आत घुसवले. माझ्याकडे सर्व कागदपत्रं आहेत. ओरिजनल व्हिक्टीम आहेत, त्यांना धमकावले आहे. पवई पेरुबागच्या झोपडपट्टीच्या पुनर्वसन प्रकल्पावर फडणवीसांनी सही केली. फडणवीसांना हा घोटाळा माहीतही नसेल. सोमय्या आणि त्यांच्या एजंटांनी 433 लोकांकडून प्रत्येकी 25-25 लाख रुपये घेतले. म्हणजे 200 ते 300 कोटी रुपयांचा हा व्यवहार आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि ईडी ऐकत असेल तर त्यांनी पहावं, असं ते म्हणाले.
माझ्याकडे त्या घोटाळ्याचे ट्रकभरून कागद आहेत. 433 बोगस लोक कुठून आले? त्यांचे बोगस आधारकार्ड बनवले गेले आणि कागदपत्रं बनवले गेले. त्यातून त्यांनी 300 कोटी जमा केले. कागदावर सही करणाऱ्या फडणवीसांना 50 कोटी द्यायचे आहे असं सोमय्या सांगत होता. त्यांनी फडणवीसांच्या नावानेही पैसा वसूल केला. 300 कोटींची वसूली फडणवीसांच्या नावाने केली. मीही कागदपत्रं आर्थिग गुन्हे शाखेकडे देणार आहे. फडणवीसांच्या नावावर शेकडो कोटी गोळा केल्याची प्रकरण माझ्याकडे आली आहेत, असा दावाही त्यांनी सांगितलं.
चंद्रकांतदादांनी या प्रकरणात पडू नये. उघडे पडतील. बेगाने शादी में नाचू नका. लोकं सोमय्यांची धिंड काढतील. तुमचेही कपडे फाडतील. मी तेव्हाही म्हणालो फडणवीसांकडून असं काम होणार नाही. पण त्यांच्या नावाने कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत. मी आता मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो आहे. काय चाललं होतं या महाराष्ट्रात? मी सोमय्यांची रोज एक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढणार आहे. सोमय्यांची 211 प्रकरणे आहेत. साडेसात हजार कोटींचा घोटाळा सोमय्या यांनी केला. ज्या माझ्या विरोधात कोर्टात. फडणवीसांना या घोटाळ्याची माहिती असेल असं मला वाटत नाही. दिल्लीतील काही मंत्र्यांच्या नावावर शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढले आहेत. ही प्रकरणे मी काढत आहे. उखडना है तो उखाडलो, असा इशाराही त्यांनी दिला.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 16 February 2022 pic.twitter.com/XxQIcpHKNw
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2022
संबंधित बातम्या:
अमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, कोणत्या वाहिनीवर दिसणार मालिका