तिसरी आघाडी ही महाविकास आघाडीची मते कमी करण्यासाठी आहे. ती सत्ताधाऱ्यांना मदत करण्यासाठी बनवली जाते. केंद्रात किंवा राज्यात जे सत्तेत असतात त्यांना काही अडचणीचे विषय असतात. मग ते तिसरी आघाडी निर्माण करुन विरोधकांच्या मतांमध्ये दुफळी माजवण्याचे काम करतात. आतापर्यंतचा इतिहास तेच सांगतो. विधानसभेत खरी लढत महायुती आणि महाविकास आघाडीत आहे. परंतु महाविकास आघाडीची मते कमी करण्यासाठी या नवीन आघाड्या स्थापन केल्या जात आहेत. त्यासाठी पैशांचा आणि पदांचा वापर केला जात आहे, असा आरोप शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी केला.
लोकसभेतील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, आत्मविश्वास फक्त काँग्रेसचा नाही तर महाविकास आघाडीचा वाढला आहे. विधानसभेसाठी तीन पक्षांनी एकत्र काम केल्यावरच आत्मविश्वास वाढेल. जर त्यांना वाटत असेल आत्मविश्वास त्यांचा वाढला आहे तर तो कोणाचा आणि कसा आहे, त्याचा अभ्यास करावे लागणार आहे. मग हा अभ्यासाचा विषय आहे. तीन पक्ष लोकसभा ज्या पद्धतीने लढले त्याच पद्धतीने विधानसभेत लढणार आहे.
लोकसभेत ४८ जागा होत्या. त्यामुळे जागा वाटप सोपे होते. आता विधानसभेत छोटे पक्ष आहेत. त्यांचाही समावेश करुन घेण्यात येणार आहे. सर्व स्थान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. माध्यमांमध्ये मुंबईच्या जागा वाटपाबाबत जी चर्चा सुरु आहे, ती खोटी आहे. कोणत्याही जागेवर मतभेद नाही. एखाद्या दुसऱ्या जागेवर मतभेद असतील तर पुन्हा चर्चा होईल. तीन पक्षांचे हायकंमाडमध्ये चर्चा होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले.
भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे राज्य कमकुवत झाले आहे. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. विरोधी पक्षनेते विजय वड़्डटेवार यांना यासंदर्भात आरोप केले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेले आहे, ते पुन्हा महाराष्ट्राला द्या, असे संजय राऊत यांनी म्हटले.