महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपद आणि सरकार स्थापन करण्याबाबत अजूनही निर्णय होत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारचा शपथविधीची कार्यक्रम ठरला. पण मुख्यमंत्री कोण होणार? हे माहीत नाही. यावरुन शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. राज्यातील सरकार केवळ गृहमंत्रीपदावरुन थांबलेले नाही. त्याच्या मागे काही वेगळे कारणे आहेत? आता उद्यापर्यंत सर्व उलगडा झाला नाही तर आम्ही आमचे बंद असलेले पुस्तक उघडू, असा थेट इशारा संजय राऊत यांनी महायुतीला दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद का हवे आहे? त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांना पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे हवी आहे. त्यांना पोलिसांचा सलाम हवा. दुसऱ्या क्रमांकाचा खाते गृहखाते आहे. ते असल्यास त्यांची आतापर्यंतची सर्व कृत्य झाकली जातील. त्यामुळे ती लोक गृहमंत्रीपदावर अडून बसले आहे. परंतु सरकार स्थापन करण्यास उशीर फक्त गृहमंत्रीपदावरुन होत नाही, त्यामागे इतर काही कारणे आहे. ती आम्हाला माहीत आहे. योग्य वेळी ती जाहीर करु, असे संजय राऊत यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत लवचिकता दाखवली, तशी उद्धव ठाकरे यांनी दाखवली नाही? या प्रश्नावर राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. परंतु भाजपला बाळासाहेब ठाकरे नको होते. मातोश्री नको होते. त्यांना खरी शिवसेना नको होती. त्यांना खरी शिवसेना नष्ट करायची होती. आता तुम्हाला कळले खरे काय आणि खोटे आहे काय, राऊत यांनी म्हटले.
गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उबाठाचे दहा आमदार आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले, त्यावर राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्ला केले. ते गुलाबराव पाटील यांना म्हणाले, थोडे दिवस थांबा, तुमचा पक्ष शिल्लक राहील का? हे कळेल. आमच्याकडे राहिलेले कडवट शिवसैनिक आणि निष्ठवंत आहे. तुमचासारखा गाळ आणि पालापोचाळा गेला आहे.