मला तोंड उघडायला लावू नका; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊत यांचा थेट फडणवीस यांना इशारा

| Updated on: Mar 17, 2023 | 10:42 AM

अमृता फडणवीस यांच्या ब्लॅकमेलिंग प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचं नाव घेतलं. त्यावरून आता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आले आहेत. राऊत यांनी तर थेट फडणवीस यांना इशारा दिला आहे.

मला तोंड उघडायला लावू नका; त्या प्रकरणावरून संजय राऊत यांचा थेट फडणवीस यांना इशारा
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : अमृता फडणवीस यांना एका फॅशन डिझायनरने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आहे. थेट गृहमंत्र्याच्याच पत्नीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेने जे व्हिडिओ पाठवले होते, त्यात आधीच्या सरकारमधील बड्या नेत्यांची संभाषणे आहेत. पण प्रकरण गंभीर असल्याने मला त्यात राजकारण करायचं नाही, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीस यांच्या या विधानावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मला तोंड उघडायला लावू नका. हा कौटुंबिक विषय आहे. त्यात आम्ही जाणार नाही. नाही तर आम्हीही वेगळा तपास करू शकतो, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

आमदारांना धमक्या येतात. खासदारांना धमक्या येत आहेत. खंडण्या ब्लॅकमेलिंग समोर सुरू आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस नाकाने कांदे सोलत आहेत. विरोधकांवर खापर फोडत आहेत. तुमच्या काळात असे होते… असं म्हणून आरोप करत आहे. आमचा काळ काय बघता? तुमच्या काळात काय होतंय ते बघा. तुमचा काळ कधी येणार? मोदी काँग्रेसचा सत्तर वर्षाचा काळ पाहत आहेत. तुम्हीही तेच करत आहात. तुमच्या काळाकडे कधी पाहणार? तुमचा काळ कधी येणार? असे सवालच संजय राऊत यांनी केले आहेत.

हे सुद्धा वाचा

गुळगुळीत रेकॉर्ड लावू नका

अमृता फडणवीस यांना ब्लॅकेमेल करण्याचा प्रयत्न झाला. हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. भाजपला कुटुंबात घुसण्याची सवय आहे. आम्हाला नाही. आम्ही कुटुंबात जात नाही. आमच्यावर संस्कार आहे. प्रकरण पोलिसात आहे. पण प्रकरण गंभीर आहे. महाविकास आघाडीत काय झालं? ही गुळगुळीत रेकॉर्ड लावू नका. तुमच्या घरात काय झालं यात महाविकास आघाडीचा संबंध काय? मला तोंड उघडायला लावू नका. परत सांगतो हा कौटुंबिक विषय आहे. त्यात आम्ही जाणार नाही, असं राऊत म्हणाले.

कोणत्याही महिलेची बदनामी होता कामा नये

ब्लॅकमेलिंगचा तपास पोलिसांनी करावा. आम्हीही तपास करू शकतो. नाही असं नाही. आम्हीही राजकारणात आहोत. महाराष्ट्रात अशा घटना घडू नये. एखाद्या महिलेला असं बदनाम करू नये. कोणीही असेल… मुख्यमंत्र्याची पत्नी असेल, उपमुख्यमंत्र्याची पत्नी असेल की सामान्य स्त्री असेल. कुणाबाबतही अशा घटना घडताच कामा नये. ज्या अर्थी अशी घटना घडते याचा अर्थ कायद्याचा धाक राहिला नाही. किंवा पोलिसांवर दबाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आमच्यावर फोर्स करू नका

या प्रकरणात विरोधकांवर बोट दाखवण्याचं कारण नाही. तुमच्या घरी कोण येत असेल तर महाविकास आघाडीचा संबंध काय. इतके महिने येत असेल तर तुमच्याकडे सरकार आहे. तुमच्या हातात गृहखातं आहे. तुम्ही काय करत होता? त्यामुळे आमच्यावर खापर फोडू नका. म्हणून म्हणतो काय होतास तू? काय झालास तू? परत परत सांगतो या विषयावर आम्हाला डिबेट करायला लावू नका. आम्ही करणार नाही. आमच्यावर फोर्स करू नका. तपास होऊ द्या. विरोधकांना ईडीच्या माध्यमातूनही ब्लॅकमेल केलं जातंय. त्यावर बोला, असं आव्हानच त्यांनी दिलं.