मुंबई : आज दुपारी 4 वाजता शिवसेना खासदार संजय राऊतांची (Sanjay Raut) बहुचर्चित पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेने राजकारण तापवलं आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष राऊतांच्या या पत्रकार परिषदेकडे (Sanjay Raut Press Conference) लगाले आहे. भाजप आणि ईडीच्या (Bjp And ED) कारवाईंना संजय राऊत काय उत्तर देणार? संजय राऊत कुठला मोठा राजकीय गौप्यस्फोट करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेने मुंबईत जणू भगवं वादळ निर्माण केले आहे. या पत्रकार परिषदेची तयारीही जोरदार करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेसाठी चक्क एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेसाठी राज्यभरातून नेतेमंडळी मुंबईत, शिवसेना भवन दादर परिसरात जमत आहे. त्यामुळे मुंबईला आणि दादर परिसराला आज भगव्या वादळाचे स्वरूप आले आहे. मै झुकेगा नहीं, असा आशय छापलेले टी-शर्ट घालून मोठ्या संख्येने शिवसैनिक शिवसेना भवन परिसरात जमत आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेसाठी वातावरण निर्मित होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सोमय्यांना धक्काबुक्की करणारे शिवसैनिकही मुंबईत
पुण्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप असणारे शिवसैनिकही मुंबत दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पुण्यातील शिवसेना नेते आणि नगरसेवकही राऊतांच्या पत्रकार परिषदेसाठी मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुंबई एकूणच शिवसेना भवन परिसरात शिवसेना या पत्रकार परिषदेवेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसून येत आहे. या पत्रकार परिषदेतून काय बाहेर येणार? हे मात्र दुपारी चार नंतरच कळेल. सध्या तरी या वातावरण निर्मितीने पत्रकार परिषदेचा सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
गर्दी टाळण्याचे पोलिसांचे आवाहन
या पत्रकार परिषदे आधी मुंबईतील राजकीय वातावरण तर टाईट झालेच आहे. मात्र मुंबई पोलिसांनी शिवसेना भवन परिसरात तगडा बंदोबस्त लावून छावणीचे स्वरूप आणले आहे. या राजकीय कार्यक्रमाचा मुंबईतील वाहतुकीवरही ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारी दादरमधील शिवसेना भवन परिसरात शिवसैनिक आणि इतर राजकीय मंडळी, पत्रकार गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आधीच वाहतूक पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. या परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
संजय राऊतांची फाईट, मुंबईतील वातावरण टाईट, सेनाभवन परिसरातील वाहतुकीबाबत काय आवाहन?
Shiv Sena Bhavan | शिवसेना भवन परिसरात जय्यत तयारी! LED स्क्रीन सज्ज, कार्यकर्त्यांची लगबग