मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती, त्यांनीच लक्ष घालावं: संजय राऊत

| Updated on: May 29, 2021 | 10:39 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. (sanjay raut reaction on maratha reservation)

मराठा आरक्षणाच्या हुकूमाची पाने मोदींच्याच हाती, त्यांनीच लक्ष घालावं: संजय राऊत
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्र सरकारच्या हातात टोलवला आहे. मराठा आरक्षणाची हुकूमी पानं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हाती आहेत. त्यांनीच ही पानं टाकावीत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. (sanjay raut reaction on maratha reservation)

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे उत्तर दिलं. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असं राऊत म्हणाले.

प्रमुख भेट मोदींबरोबरच हवी

खासदार संभाजी छत्रपती हे महाराष्ट्रातील सन्माननीय नेते आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा संताप आणि भूमिका सरकारने समजून घेण्याची गरज आहे. सरकार समजूनही घेत आहे. संभाजीराजे सर्वांना भेटले. ते मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंना भेटले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनाही भेटले. मात्र सर्वात प्रमुख भेट ही पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच असायला हवी. हा प्रश्न आता राज्याच्या हातात राहिला नाही. तो केंद्राच्या कोर्टात गेला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लक्षद्वीपमध्येच बीफ बंदी का?

यावेळी त्यांनी केंद्रशासित प्रदेशात असंतोष असल्याचं त्यांनी सांगितलं. गोव्यात बीफ विक्री सुरू आहे. इतर भाजपशासित राज्यात बीफ विक्री केली जात आहे. मग लक्षद्वीपमध्येच बीफ बंदी का? त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे, असं त्यांनी सांगितलं. (sanjay raut reaction on maratha reservation)

 

संबंधित बातम्या:

निर्णय घेताना समाजाचा विचार करा, स्वार्थ पाहू नका; प्रसाद लाड यांचे संभाजीराजेंना आवाहन

खासदार संभाजी छत्रपती नवीन पक्ष स्थापन करणार?, सोशल मीडियात जोरदार चर्चा; आंबेडकरांचीही शनिवारी भेट घेणार

बघू कोण किती प्रामाणिक आहे ते?; मराठा आरक्षणावरून अशोक चव्हाणांचा भाजपला इशारा

(sanjay raut reaction on maratha reservation)