महाविकास आघाडीतील जागा वाटपाचं सूत्र काय?; संजय राऊत यांनी दिलं रोखठोक उत्तर

| Updated on: Mar 01, 2024 | 2:22 PM

Sanajy Raut | महाविकास आघाडीत जो जिंकेल, त्याला जागा देण्याचे सूत्र आम्ही ठरवले. त्यासाठी प्रत्येक जागेचा विचार आम्ही केला आहे. यामुळे या निवडणुकीत आम्हाला चांगली आघाडी मिळणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा समावेश आम्ही आघाडीत करणार आहोत.

महाविकास आघाडीतील जागा वाटपाचं सूत्र काय?; संजय राऊत यांनी दिलं रोखठोक उत्तर
Follow us on

मुंबई | दि. 1 मार्च 2024 : प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत यायचं आहे. त्यांना मायावतीप्रमाणे वेगळा मार्ग स्वीकारायचं असं वाटत नाही. सध्याच्या सरकारकडून संविधान, कायदा आणि लोकशाही बाबत ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्यामुळे आंबेडकरी समाज अस्वस्थ आहेत. हुकूमशाही सहन करायची नाही, असं समाजाचं म्हणणं आहे. नेत्यांवर दबाव आहे. त्यामुळे सर्व नेते महाविकास आघाडीसोबत आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कुणीही भाजपची सुपारी घेऊन येणार नाही. प्रकाश आंबेडकर या प्रकारचे नेते नाही. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका स्पष्ट आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या महासंग्राम या टीव्ही ९ मराठीच्या कार्यक्रमात सांगितले.

अटी शर्ती नाही. त्यांनी २७ जागा मागितल्या नाही. २७ जागांवर त्यांनी तयारी केली आहे. त्यांचं कॅडर आहे. आघाडी किती जागा देऊ शकतात असं त्यांनी विचारलं. विचारणं हे रास्त आहे. त्यांनी पत्रातून जागा मागितल्या नाही. प्रकाश आंबेडकर यांची अंतिम बैठकीला यायची इच्छा आहे. उद्धव ठाकरे , शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासोबत बैठक घेण्याची प्रकाश आंबेडकर यांची इच्छा आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

आघाडीचा पोपट मेला का?

महाविकास आघाडीचा मुळात पोपट झालेलाच नाही. आमची युती आहे. आमच्यासोबत सर्व डावे पक्ष आहे. आंबेडकर यांच्या भूमिकेवरून निष्कर्ष काढू नका. आंबेडकर आमच्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आधी लढलो आहोत. त्यांची आघाडीत यायची इच्छा होती. त्यामुळे त्यांना सोबत घेतलं. सन्माने चर्चा केली आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीत जो जिंकेल, त्याला जागा देण्याचे सूत्र आम्ही ठरवले. त्यासाठी प्रत्येक जागेचा विचार आम्ही केला आहे. यामुळे या निवडणुकीत आम्हाला चांगली आघाडी मिळणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा समावेश आम्ही आघाडीत करणार आहोत. येत्या पाच तारखेला जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार उपस्थित राहणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

महाविकास आघाडीत राहणार

उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काय चर्चा झाली, ते अनेक वेळा सांगितले आहे. त्यावेळी मोदी यांना वाटत होते की शिवसेना पुन्हा भाजपसोबत यावी. ते उद्धव ठाकरे यांनी आमच्या पक्षात सांगितले. परंतु आम्ही सर्वांनी विचार केला की, ज्या पक्षांनी आपणास फसवले आहे. त्यांच्यासोबत का जावे? आजही भाजपचे दिल्लीतील अनेक नेते आम्हाला बोलवत आहे. आमच्याकडून चुका झाल्याचे ते मान्य करत आहेत. परंतु आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

ही ही वाचा

पाच वर्षांत मराठ्यांची संख्या वाढण्याऐवजी कशी कमी झाली ? नाना पटोले यांनी ठेवले बोट