संजय राऊत म्हणाले की, कशी घडवणार क्रांती. भाजप सोबत राहून अप्रत्यक्षपणे मोदी शाहांना आपलं दैवत मानून मोदी शाह जे देशाचे तारणहार आहेत असं सांगून कोणी क्रांती करतं का. देशाने मोदी शाहांचा पराभव केला आहे. त्यांना बहुमत नाही. यामध्ये महाराष्ट्राची भूमिका मोलाची आहे. हिंदू दुर्बल आहेत असं सरसंघचालकांना कोणी सांगितलं. हिंदूंना दुर्बल करण्याचे काम त्यांच्या पाठिंब्यावर चाललेलं दिल्लीतील सरकार करतंय. आपआपसात जातीय भांडण लावणं, प्रांताप्रांतात वाद करणे.
मणिपूरमध्ये जे सुरु आहे ती दुर्बलता दिसत नाही का सरसंघचालकांना. अनेक ठिकाणी हिंदूना अपमानित करण्याचं काम ही केंद्राची दुर्बलता आहे. हिंदू महिलांवर अत्याचार झाला. हिंदू हा विचाराने प्रगल्भ होता किंवा आहे. पण त्यांना मानसिकदृष्ट्या विकलांग करण्याचं काम आताचं सरकार करत आहेत.’
‘महाराष्ट्रात असे जातीचे मेळावे होऊ नयेत. शिवसेना प्रमुखांचा मेळावा हा जातीचा मेळावा नव्हता. तो हिंदू आणि मराठी बांधवांचा मेळावा होता. आता ड्युप्लिकेट शिवसेनेचा मेळावा हा भाडोत्रा लोकांचा मेळावा आहे. पैसे देऊन लोकं आणतात. खाऊ पिऊ घालतात.
‘पंकजा मुंडे यांचा मेळावा हा समाजाचा मेळावा असला तरी सर्व समावेशक मेळावा असतो. नारायण गडावर आता मराठा समाजाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी मेळावा घेतला. मी पाहिले लाखो लोकं जमले. असे नेत्याविषयी प्रचंड आकर्षण असल्याने असे लोकं जमतात.’ प्रत्येक नेत्याला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. या मेळाव्यातून लोकं काय घेऊन जातात हे महत्त्वाचं असतं.
जागावाटप कधीही जाहीर करु शकतो. ही काय अवघड गोष्ट नाही. आघाडीतील बरंच काम मार्गी लागलेलं आहे. काही जागा शेवटपर्यंत चर्चेत राहतात. तिन्ही पक्षामध्ये सामंजस्याची भावना आहे. आमच्यात संस्कार आहे आम्ही शांतपणे करतोय सगळं. असं ही संजय राऊत यांनी म्हटले आहे.