‘स्वत:ची पोरं दाखवा, दुसऱ्यांच्या पोरांना तुमची नावं देऊ नका’; संजय राऊत यांचा भाजपवर हल्ला

| Updated on: Mar 01, 2024 | 2:55 PM

"कुणी ऐरागैरा येतो पक्षावर चिन्हावर दावा सांगतो. दरोडा टाकतो. त्या दरोड्याला निवडणूक आयोग मदत करतात. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी पक्षाला जन्म दिला का? सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलं आहे. जनताही पाहत आहे. देशातील जनतेला कळतंय. शरद पवार हयात आहे, आणि अजित पवार पक्षावर दावा सांगत आहे. निवडणूक आयोगही देत आहे. ही काय पाकिटमारी आहे का?", असा सवाल संजय राऊतांनी केला.

स्वत:ची पोरं दाखवा, दुसऱ्यांच्या पोरांना तुमची नावं देऊ नका; संजय राऊत यांचा भाजपवर हल्ला
Follow us on

मुंबई | 1 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या लोकसभेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. राज्यात घडून आलेलं सत्तांतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेला शिवसेना पक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेला राष्ट्रवादी पक्ष यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच विरोधी पक्षांमधील ज्येष्ठ नेत्यांचं भाजपमध्ये होत असलेल्या पक्षांतरावरही संजय राऊत यांनी बोट ठेवलं. यावेळी त्यांनी भाजपवर खोचक शब्दांत टीका केली. तसेच त्यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरुनही भाजपला घेरलं. काँग्रेस काळातील कामांवर भाजप हक्क सांगत आहे, असा दावा संजय राऊतांनी केा. त्यामुळे’स्वत:ची पोरं दाखवा, दुसऱ्यांच्या पोरांना तुमची नावं देऊ नका’, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. याच घटनेवरुन त्यांनी भाजपला टोला लगावला.

“चिन्हं पोहोचलं. मशाल पोहोचली. तुतारी पोहोचली. घड्याळ आणि धनुष्यबाणाचं काय करायचं हा प्रश्न आहे? चिन्ह घेतलं म्हणजे तुम्ही बादशाह होत नाही. जिथे ठाकरे तिकडे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी. कुणी ऐरागैरा येतो पक्षावर चिन्हावर दावा सांगतो. दरोडा टाकतो. त्या दरोड्याला निवडणूक आयोग मदत करतात. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी पक्षाला जन्म दिला का? सर्वोच्च न्यायालयानेही सांगितलं आहे. जनताही पाहत आहे. देशातील जनतेला कळतंय. शरद पवार हयात आहे, आणि अजित पवार पक्षावर दावा सांगत आहे. निवडणूक आयोगही देत आहे. ही काय पाकिटमारी आहे का? अनेक चोरलेले पक्ष आले आणि गेले. जनता पक्षाचे अधिकार डॉ. सुब्रमण्यम स्वामीकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे अधिकार गेले का? आमचा पक्ष फुटल्यावर आम्ही मशालवर लढलो. आमचा उमदेवार निवडून आले”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘स्वत:ची पोरं दाखवा, दुसऱ्यांच्या पोरांना तुमचं नाव देऊ नका’

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काय आहे? रामाची लहर आहे. कुठे आहे रामाची लहर? राम काय त्यांच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव लिहिलंय का? मोदींनी काय केलं? त्यांची दहा कामे दाखवा जी त्यांची स्वत:ची आहे. यूपीए केलेल्या काळात केलेली कामांचं उद्घाटन करत फिरत आहेत. अटल सेतू काँग्रेसच्या काळातील आहे. स्वत:ची पोरं दाखवा. दुसऱ्यांच्या पोरांना तुमचं नाव देऊ नका”, अशा शब्दांत संजय राऊतांनी घणाघात केला.