मुंबई: राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला (wine) परवानगी दिली आहे. त्यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्याला मद्य महाराष्ट्र बनवणार आहात का? असा सवाल भाजपने (bjp) केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपच्या या टीकेचा समचार घेताना भाजपला शेतकरी विरोधी ठरवलं आहे. राज्य सरकारने सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला दिलेली परवानगी हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वाईनला विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही समजून घ्यावं, असं सांगतानाच वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करणारे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे. त्यावर भाजप काय उत्तर देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. वाईन हे शेतकरी पिकवत असलेल्या फळांपासून बनवत येणार उत्पादन आहे. त्याला मद्याचा दर्जा आहे का माहीत नाही. असेल तर देशात दारूबंदी आहे का? महाराष्ट्रात सुपर मार्केट, मॉल्समध्ये वाईन विक्रीला सवलत दिली आहे. त्याला जे राजकीय पक्ष विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत. द्राक्ष, चिकू, काजू, पेरू, बडीशेप हे शेतकऱ्यांचं उत्पादन आहे. यापासून दारू बनवली तर शेतकऱ्यांच्या या मालाला भाव येईल. त्यांचं उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली होईल. अशा अनेक गोष्टी आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. जे राजकीय पक्ष टीका करत आहेत त्यांनी शेतकऱ्यांचं आर्थिक गणित समजून घ्यावं. नाही तर हे शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. कारण ते शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असं ते राऊत म्हणाले.
आधीच मर्कट त्यात मद्य प्यायले अशी आपल्याकडे म्हण आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे. परंपरा आहे. महाराष्ट्राने काय खावं आणि काय नाही याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे समर्थ आहेत. त्यांना जास्त अनुभव आहे राज्य चालवण्याचा. तुम्ही ही लेबलं लावू नका. शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय धाडसाने घ्यावे लागतात. तुम्हाला तुमच्या काळात कोणते निर्णय घ्यायचे होते आणि ते कसे रोखले गेले. त्यातून महाराष्ट्र खऱ्या अर्थाने मद्य राष्ट्र झालं असतं. ते आम्ही होऊ दिलं नाही. पण वायनरीचा संबंध शेतकऱ्यांशी आहे, शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळत असेल तर राज्यच नव्हे तर केंद्र सरकारने त्यावर निर्णय घ्यायला हवा, असंही ते म्हणाले.
VIDEO : Sanjay Raut | महाराष्ट्र मद्यराष्ट्र होणार होतं, आम्ही होऊ दिलं नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला@rautsanjay61
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/spNj1ZNafa
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2022
संबंधित बातम्या:
Maharashtra Mla Suspension: न्यायालयाचे दिलासे एकाच राजकीय पक्षाला कसे मिळतात?; संजय राऊतांचा सवाल
Crime | सिगारेट उधार न दिल्याचा राग, दारुच्या नशेत दुकानदाराचा खून, रात्रीच्या अंधारात भयंकर कृत्य