मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये; संजय राऊत यांचं विरोधकांना आवाहन

| Updated on: Mar 10, 2021 | 10:39 AM

सरकारने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं आहे, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. (sanjay raut slams bjp over mansukh hiren death case)

मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये; संजय राऊत यांचं विरोधकांना आवाहन
Sanjay Raut
Follow us on

मुंबई: सरकारने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं आहे, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं कोणी फासलं? असा सवाल करतानाच विरोधी पक्षाने पोलिसांच्या तोंडाला काळं फासू नये. देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष सत्तेत होते. पोलिसांचं काम कसं चालतं हे त्यांना माहीत आहे. त्यांनी अशी भाषा करू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला. तसेच मुनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. (sanjay raut slams bjp over mansukh hiren death case)

हिरेन प्रकरणी पोलिसांचं खच्चीकरण

टीव्ही 9 मराठीशी बोलताना संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करू नये. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक यांचा असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर यांचा असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच हवा. त्यासाठी राज्याचे पोलीस आणि यंत्रणा सक्षम आहेत. विरोधी पक्षाने त्यावर शंका घेणं म्हणजे पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्यासारखं आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील आणि त्याची दखल घेतली जात नसेल तर त्यांनी वेगवेळ्या प्लॅटफॉर्मवर आवाज उठवला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

एनआयएला तपास देण्यामागे काळंबेरं

हिरेन प्रकरणाचा एनआयएला तपास करू द्या. एटीएसचा तपास सुरू आहे. निष्कर्ष आला नाही. घाईघाईत एनआयएला तपास देणं यात मला तरी काही तरी काळंबेरं असल्याचं दिसून येतं, असा दावाही त्यांनी केला.

लॉकडाऊन परवडणार नाही

लॉकडाऊन जनतेला परवडणार नाही, मुख्यमंत्र्यांनीही तेच सांगितलं आहे. लॉकडाऊन जनतेनं टाळलं पाहिजे. सरकारवर खापर फोडता येत नाही. लोक गर्दी करतात, मास्क वापरत नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जनतेने कोरोना नियमाचं पालन केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

भाजपने वजन खर्ची घालावं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. आता विरोधी पक्षाने आपलं वजन आणि पत खर्ची घालून हा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला. (sanjay raut slams bjp over mansukh hiren death case)

 

संबंधित बातम्या:

Mansukh Hiren Death Case | सचिन वाझेंच्या राजीनाम्यासाठी वाढता राजकीय दबाव, ठाकरे सरकारमध्येच दोन मतं

NIA टीम मुंबईत दाखल, मुकेश अंबानींच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी होणार?

धमाकेदार ऑफर! 10 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा iPhone 6 आणि 6s, वाचा सविस्तर

(sanjay raut slams bjp over mansukh hiren death case)