भाजपमधील लोकांचे मेंदू किड्यामुंग्यांचे; संजय राऊत यांची जहरी टीका कुणावर?

| Updated on: Dec 16, 2022 | 10:58 AM

महाराष्ट्र कधी निर्माण झाला? मध्यप्रदेश कधी निर्माण झाला? बिहार कधी निर्माण झालं? त्यांना कळतं का? अभ्यास त्यांनी करायचा आहे. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा देशात एकही राज्य नव्हतं.

भाजपमधील लोकांचे मेंदू किड्यामुंग्यांचे; संजय राऊत यांची जहरी टीका कुणावर?
भाजपमधील लोकांचे मेंदू किड्यामुंग्यांचे; संजय राऊत यांची जहरी टीका कुणावर?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्यप्रदेशातील महू येथे झाला. इतके सामान्य ज्ञान असू नये. महापुरुषांबद्दल चुकीची माहिती तुम्ही देता. महापुरुषांचा अवमान करता अन् मोर्चे काढता? असा संतप्त सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना केला होता. चित्रा वाघ यांच्या या विधानाचा राऊत यांनी समाचार घेतला आहे. बाबासाहेबांचा जन्म झाला. तेव्हा भाषिक राज्यांची निर्मिती झाली नव्हती. तेव्हा फक्त मुंबई प्रांत होता. त्यामुळेच बाबासाहेब हे महाराष्ट्राचे सुपूत्र ठरत नाहीत का? असा सवाल करतानाच भाजपच्या नेत्यांचा मेंदू किड्यामुंग्यांचा झाला आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केली.

माझं विधान काय आहे? त्यात अपमान काय आहे? काही भाजपच्या लोकांचे मेंदू किड्यामुंग्याचे आहेत. दुर्देवाने असं म्हणावे वाटते. घटनाकार बाबासाहेबर आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्रं नाहीत का? त्यांचा जन्म या देशातच झाला. बाबासाहेबांचा जन्म 1891मध्ये महू येथे झाला होता. महू सध्या मध्यप्रदेशात आहे. तेव्हा मध्यप्रदेशात नव्हतं. भाषिक राज्य कधी निर्माण झाली याचा अभ्यास करा, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी चित्रा वाघ यांना दिलं.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र कधी निर्माण झाला? मध्यप्रदेश कधी निर्माण झाला? बिहार कधी निर्माण झालं? त्यांना कळतं का? अभ्यास त्यांनी करायचा आहे. बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा देशात एकही राज्य नव्हतं. एकच मुंबई प्रांत होता. बाबासाहेब महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. हे त्यांना माहीत नसेल, कळत नसेल तर त्यांच्या अजूनही बाबासाहेबांविषयींच्या भावना काय आहेत हे दिसून येते, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपमध्ये बाहेरून काय लायकीचे आणि बुद्धीचे लोकं घेतली हे या लोकांच्या विधानावरून कळतंय. त्यांच्या जीभेवर काय, डोक्यात काय, पोटात काय… हे लोक वारंवार महापुरुषांचा अवमान करत आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत. बाबासाहेब देशात जन्मले ते देशाचं भाग्य आहे. त्यांना वाटत नसेल तर ते त्यांचं दुर्भाग्य आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी महामोर्चाच्या परवानगीवरून सरकारवर टीका केली. सरकार निर्लज्ज आहे. सत्ताधारी पक्षाला आमच्या महापुरुषांविषयी श्रद्धा नसेल तर हे सरकार लाचार आहे. शिवाजी महाराजांचा अवमान झाला तरी सरकार गप्प आहे.

बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या अपमानानंतरही सरकार गप्प आहे. उगाच गांडुळासारखी जीभ वळवळ करत आहे म्हणून हा मोर्चा आहे. ही पोटदुखी आहे त्यांची, असा घणाघात त्यांनी चढवला.