मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार शेतकऱ्यांमधील असंतोष दिसून आला आहे. अनेकदा शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी राजधानी मुंबईवर मोर्चे आणले आहेत. आता साताऱ्यातील शेतकऱ्यांनीही असाच मोर्चा आणला आहे. मात्र, या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या मागण्या या सरकारला कळाव्यात म्हणून शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत मोर्चा आणला आहे.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा गावातील 100 ते 150 शेतकरी अर्धनग्न मोर्चा घेऊन मंत्रालयावर निघाले आहेत. या मोर्चेकऱ्यांना मुंबई पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरच म्हणजे मानखुर्द येथे अडवले. मोर्चकरी शेतकऱ्यांना पोलीस वाहनाद्वारे आझाद मैदानात नेले जाणार आहे.
VIDEO : शेतकऱ्यांचा मागण्या नेमक्या काय आहेत?
मोर्चेकरी शेतकऱ्यांनी पायी जाण्याचा अट्टाहास केला आहे. त्यामुळे मोर्चेकरी खाडी पुलाजवळ ठिय्या मांडून बसले आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, त्या बदल्यात योग्य मोबदला, तसेच स्थानिकांना काम, यासाठी हा मोर्चा आहे.
पाहा बातमीचा व्हिडीओ :