राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून, तसेच सायबर कॅफे आणि सेतू केंद्रावरून अर्ज भरला जात आहे. पण अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी पन्नास रुपये मानधन दिलं जात आहे. मात्र सेतू केंद्रांना एकही रुपया दिला जात नसल्याने नंदुरबार जिल्ह्यात सेतू केंद्रांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज भरण्यास बहिष्कार टाकण्यात आला आहे. सरकार आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही महिलेच्या फॉर्म भरणार नाही आहेत, अशी भूमिका सेतू केंद्र चालकांनी घेतली आहे.
एकीकडे सरकार चांगल्या योजना राबवत आहे. मात्र महिला ज्यांच्याकडून अर्ज भरून घेत आहेत त्यांना मोबदला मिळत नाही म्हणून सेतू केंद्र आता कुठलाही अर्ज फुकटात भरणार नाही, अशी भूमिका घेताना दिसत आहेत. जोपर्यंत सरकार मानधन देणार नाही तोपर्यंत या योजनेवर नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच सेतू केंद्रांकडून बहिष्कार टाकण्यात आला आहे. यामुळे महिलांचं मोठ नुकसान होणार आहे. शासनाने आम्हाला अंगणवाडी सेविका प्रमाणे मानधन द्यावे, तेव्हाच आम्ही फॉर्म भरणार, असं सेतू केंद्रांकडून सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. मोबाईल ॲप वरून महिलांना अर्ज भरता येत आहे. मात्र कम्प्युटरवर वेबसाईट अजूनही सुरू झालेली नाही. कम्प्युटरवर वेबसाईट सुरू नसल्याने मोबाईलवर कमी अर्ज भरले जात आहेत. कम्प्युटरवर सुरू झाल्यास कमी वेळात अधिक महिलांचे अर्ज भरले जातील. योजनेच्या लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सुरुवातीला अनेक अडचणी आल्या होत्या. या योजनेला कुठलेही अडचणी येऊ नये यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहेत. शहरासह जिल्ह्यातील अनेक सायबर कॅफेंवर महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर आहे.
शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. मात्र अजुनी योजना कम्प्युटरवर सुरू झालेली नसल्याने कमी प्रमाणावर अर्ज भरले जात आहेत. सर्व्हर डाऊन असल्यामुळे कम्प्युटरवरती ही योजना सुरू झालेली नाही. कम्प्युटरवर सुरू झाल्याने एका दिवसात हजारोंच्या संख्येने अर्ज भरले जातील. त्यामुळे वेबसाईट सुरू केली पाहिजे, अशी परिस्थिती उद्भवली आहे. या योजनेसाठी अनेक अडथळे निर्माण झाले होते. मात्र आता ही योजना सुरळीत सुरू झाली आहे. मोबाईलचे ॲप्सवरून अर्ज भरला जात आहे. यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. ३१ ऑगस्ट पर्यंतची याची मुदत आहे. पण महिलांकडून फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. शहरातील अनेक सायबर कॅफेवर आणि सीसीआय केंद्रांवर मोठी गर्दी महिलांची दिसून येत आहे. या योजनेसाठी कुठलेही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने नोडल अधिकारी देखील नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता ही योजना सुरळीत सुरू झाली आहे.