शरद पवार यांनी पाठराखण केली, जामिनानंतर अनिल देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Dec 28, 2022 | 9:11 PM

शरद पवार यांनी सपोर्ट केला. साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला. पाठराखण केली. मानसिकरित्या सपोर्ट केला.

शरद पवार यांनी पाठराखण केली, जामिनानंतर अनिल देशमुख यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया
पूजा देशमुख
Follow us on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज जेलच्या बाहेर आले. यावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची मुलगी पूजा देशमुख म्हणाल्या, अतिशय आनंद होतोय. आतापर्यंत त्यांची तब्ब्येत कशी होती समजत नव्हती. पण, आज त्यांना घरी घेऊन जात आहोत. याचं खूप समाधान आहे. सिद्धीविनायकाला धन्यवाद दिल्याचं पूजा देशमुख यांनी सांगितलं. २१ महिन्यांपासून बाबांना खोट्या आरोपात गोवलं गेलं. या कठीण काळातून संपूर्ण कुटुंब गेलं. त्यामुळं अतिशय मानसिक त्रास झाला. ईडी, सीबीआय (CBI) रेडमुळं बऱ्याच समस्यांना समोरे जावं लागलं. बाबांची प्रकृती खराब झाली होती.

आता उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला. आरोपात तत्थ्य नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय. न्यायदेवतेवरील आमचा विश्वास दृढ झाला. सत्य बाहेर येईल, असं आम्हाला वाटतं होतं. १४ महिने बाबांना तुरुंगात काढावं लागलं. हे योग्य झालं नाही.


देव आहे. देवानी न्याय दिला. शरद पवार यांनी सपोर्ट केला. साहेबांनी आम्हाला सपोर्ट केला. पाठराखण केली. मानसिकरित्या सपोर्ट केला. देव आहे. सगळ्या कोर्टाच्या वर देव असतो, असंही पूजा देशमुख म्हणाल्या.

अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी सपोर्ट केला. रेड पडत असताना काय करावं, कळत नव्हतं. पवार कुटुंबीयांनी आम्हाला आधार दिला. बाबा घरी आल्यानंतर सर्वात आधी मी त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करेन. नागपुरात अधिवेशनाला जाणार की, नाही, याबाबत काही कल्पना नसल्याचंही त्यांनी सांगितलं.