शरद पवार साहेब जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो – जयंत पाटील

| Updated on: Jun 06, 2024 | 4:39 PM

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडून आलेल्या खासदारांचं आज पक्षाच्या कार्यालयात स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी महायुतीवर जोरदार टीका केलीये. शरद पवार यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वाधिक असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.

शरद पवार साहेब जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो - जयंत पाटील
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निवडून आलेल्या खासदारांचं अभिनंदन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले की, ‘महाविकासआघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला देखील मोठं यश मिळाले आहे. महाविकासआघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र काम केलं. त्यामुळे महाविकासआघाडीला ३२ जागा मिळाल्या आहेत. पवार साहेबांनी कष्ट घेतले. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सभांमुळे महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.’

‘बजरंग सोनवणे यांच्या रुपातून आम्हाला बजरंगबली पावले आहेत. ते जायंट कीलर ठरले आहेत. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ज्यांना पाडण्य़ासाठी अनेक अदृष्यशक्ती कामाला लागली होती. ते आमचे अमोल कोल्हे हे देखील निवडून आले आहेत. ‘

‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक लवकरच होणार आहे. ज्यामध्ये पक्षाचे कमिटीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन १० जून रोजी मोठ्या दिमाखात अहमदनगरमध्ये साजरा होणार आहे. यावेळी जाहीर सभा देखील होणार आहे.’

‘आमचे खासदार महाराष्ट्रातील प्रश्न दिल्लीत लावून धरतील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाना न्याय देण्याचं काम ते करतील. जनतेच्या वतीन आमचे खासदार संघर्ष करण्याचं काम ते करतील.’

‘एक्झिट पोलचे आकडे हे शेअर मार्केट मॅन्यूपलेट करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यावर विश्वास ठेवू नये असे मी आधीच सांगितलं होतं. पण या एक्झिट पोलला काही अर्थ नाही. १० पैकी ८ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला असून सर्वात जास्त आमचा स्ट्राईक रेट राहिला आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो.’

‘आमची अनेक मते पिपाणीला गेले आहेत. दिंडोरीत एक लाखाहून अधिक मतं पिपाणीला गेले आहेत.पिपाणीचे नाव तुतारी असल्याने लोकांचा गैरसमज झाला. आम्ही यानंतर याला ऑब्जेक्शन घेणार आहे. पिपाणीला साताऱ्यात मते गेले त्यामुळे साताऱ्यात आम्हाला फटका बसला आहे. निवडणूक आयोगाला ही गोष्ट निदर्शनास आणून देणार आहोत.’

‘उद्धव ठाकरे यांचं मी अभिनंदन केले आहे. उद्धव ठाकरे हे ठाम आहेत. ते एनडीएमध्ये जातील असं मला वाटत नाही. महाविकासआघाडीचं सरकार आणण्यासाठी ते आता काम करत आहेत.’

‘केंद्र सरकार पेक्षा महाराष्ट्र सरकारबाबत लोकांची अधिक नाराजी असल्याचं आमच्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. हे चित्र महाराष्ट्रभर आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसेल असा माझा विश्वास आहे. जीएसटी सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यावर लोकं नाराज आहेत. काँग्रेस सरकार असताना अशी परिस्थिती नव्हती.’