मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दाखवून दिलं की राष्ट्रवादाचे सर्वाधिक आमदार त्यांच्यासोबत आहेत. दोन्ही गटांचं शक्ती प्रदर्शन एकाप्रकारे पाहायला मिळालं, यामध्ये अजित पवारांच्या बैठकीला 32 तर शरद पवारांच्या बैठकीला 16 आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीमध्ये आता दोन गट पडले हे उघड झालं आहे. अजित पवारांनी थेट शरद पवारांवर टीका केली आणि त्यांच्या बदलत्या भूमिकेबाबतही भाष्य केलं. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी फुटल्यावर शिक्कामोर्तबल केलं आहे.
पक्षाचा ताबा घेणं लोकशाहीत अयोग्य आहे. पुलोद सरकार बनवलं होतं. विठ्ठल म्हणायचं आणि दुर्लक्ष झालं सांगायचं. अंतःकरणात पांडुरंगाचं नाव घ्यावं. बघून घेतो असं भुजबळांनी सांगितलं आणि शपथ घेतली. इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही, असं अजित पवार म्हणाले होते. आज त्यांच्यासोबत जाऊन सत्तेत बसले. राज्याच्या ऐक्याला सुरुंग लावायचं काम फडणवीसांनी केलं. वेगळ्या विदर्भाची मागणी फडणवीसांनी केली, शब्द पाळला नसल्याची आठवणही शरद पवारांनी यावेळी करून दिली.
23 वर्षापूर्वी राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादीने अनेक नेते तयार केले. संपूर्ण देशाचं आजच्या बैठकीकडे लक्ष आहे. तुमच्या मदतीने, कष्टाने पक्षबांधणीत यशस्वी झालो. आम्ही सर्वजण सत्ताधारी पक्षात नाही, लोकांमध्ये आहोत. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद महत्वाचा आहे. मात्र देशात संवाद राहिलेला नाही. कार्यकर्त्यांनी कष्टानं पक्ष उभा केला. विरोधकांना एकत्र करायचं काम सुरु आहे. देशाचे नेते म्हणून बोलताना सभ्यता बाळगावी, असंही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, ‘उष:काल होता होता काळरात्र झाली अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, भाषण संपताना शरद पवार यांनी सुरेश भट यांच्या कवितेच्या ओळी म्हणून दाखवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.