महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकालावर शत्रृघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा निर्णय म्हणजे…

| Updated on: May 11, 2023 | 9:01 PM

देशातील सर्वात मोठी न्यायव्यवस्था आहे. सरन्यायाधीशांनी या निर्णयाचे वाचन केले. या निर्णयाचे स्वागत आपण केले पाहिजे.

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील निकालावर शत्रृघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया; म्हणाले, हा निर्णय म्हणजे...
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायायलाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांकडे बऱ्याच जबाबदाऱ्या दिल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अभिनेते शत्रृघ्न सिन्हा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता काही बोलण्याचा,टीका-टीपण्णी करण्याचा प्रश्न येत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय ही सर्वोच्च अथॉरिटी आहे. देशातील सर्वात मोठी न्यायव्यवस्था आहे. सरन्यायाधीशांनी या निर्णयाचे वाचन केले. या निर्णयाचे स्वागत आपण केले पाहिजे. जर-तर करण्याचा कुणाला अधिकार नाही. जो निर्णय झाला तो सर्वांनी मान्य करायला पाहिजे. मला वाटतं की, हा निर्णय राज्यातील जनतेच्या हिताचा आहे.

शरद पवार मोठे चाणक्य

नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. देशात महागटबंधन तयार करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. देशात भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचं काम सध्या सुरू आहे. यावर बोलतान शत्रृघ्न सिन्हा म्हणाले, नितीश कुमार हे योग्य व्यक्ती आहेत. शरद पवार राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठे चाणक्य आहेत. शरद पवार हे महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. ते देशाची आण, बाण आणि शान आहेत.

हे सुद्धा वाचा

नितीश कुमार, तेजस्वी यादव यांचीही स्तुती

शरद पवार यांना देशात मानले जाते. तेजस्वी यादव हुशार आहेत. शरद पवार यांनी नितीश कुमार यांचे स्वागत केले. ही घटना समाज, राजकीय पक्ष, महाराष्ट्र, बिहार यासाठी मोठी उपलब्धी आहे.

नवीन चांगले नेतृत्व येईल

यापूर्वी चेहऱ्यांवर चर्चा होत नव्हती. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर कोण, लाल बहादूर शास्त्री यांच्यानंतर कोण, इंदिरा गांधी यांच्यानंतर कोण, असं होत होतं. पण, नवीन चांगलं नेतृत्व आलं आणि देशाचा कारभार व्यवस्थित सुरू आहे.

कर्नाटकता एक्सिट पोलनंतर भाजपची परिस्थिती काय आहे, हे लक्षात आलं. निकालानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. चेहरा नव्हे, तर मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत. देशात महागाई, बेरोजगारी आहे. डॉलर वर जात आहे. रुपया खाली येत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे.