काल परवा त्यांच्यासोबत सावलीसारख्या होत्या, पक्ष बदलताच केला मोठा ‘गौप्यस्फोट’

| Updated on: Jun 20, 2023 | 10:00 PM

शिंदे गटावर तुटून पडणाऱ्या शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांपैकी एक अशा मनीषा कायदे यांनीही आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. गेले सहा महिने मनीषा कायंदे पक्षात नाराज होत्या.

काल परवा त्यांच्यासोबत सावलीसारख्या होत्या, पक्ष बदलताच केला मोठा गौप्यस्फोट
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा सदस्यांमधून निवडून आलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील आमदार मनीषा कायदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मनीषा कायदे यांनी २५ वर्ष भाजपमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर फार मोठा आरोप करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना प्रवक्तेपद देण्यात आले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आणि विधानसभा सदस्यांमधून त्या निवडून आल्या. आता दहा वर्षानंतर कायंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत घरोबा केला. त्यावेळी शिंदे गटावर तुटून पडणाऱ्या शिवसेनेच्या आक्रमक नेत्यांपैकी एक अशा मनीषा कायदे यांनीही आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. गेले सहा महिने मनीषा कायंदे पक्षात नाराज होत्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ज्या सभागृहातील नेते आहेत त्याच विधान परिषद सभागृहात मनीषा कायंदे आमदार होत्या.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आमदार मनीषा कायंदे यांनी पक्षात त्यांची होत असलेली अवहेलना यामुळे पक्ष सोडत असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत 1 जुलै रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यावर, मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

अडचणीच्या काळात विकास कामांसाठी निधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार येऊन केवळ एक वर्ष झाले आहे. केवळ १ वर्षच भ्रष्टाचार होत आहे का? या आधी सुद्धा भ्रष्टाचार झाला आहे. भाजप आमदार अमित साटम यांनी कॅग चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी परवानगी दिली. मनपाचा मूळ उद्देश काय आहे? सर्वसामान्य जनेतला नागरी सुविधा पुरविणे. मनपाच्या उत्पन्नामधील काही भाग FD केला जातो आणि तो अडचणीच्या काळात विकास कामांसाठी निधी वापरला जातो. तोच निधी वापरला आहे, असे कायंदे म्हणाल्या.

चांगले रस्ते नसल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम चालू झाल्यामुले लोक समाधानी आहेत. आपला दवाखाना ही व्यवस्थित चालू आहेत. या सर्व कामांसाठी निधी लागतो. महापालिकेच्या fd चा निधी विकास कामांसाठी वापरण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या विकास कामांची धास्ती ऊबाठा पक्षाने घेतली आहे. त्यामुळे 1 जुलैचा मोर्चा हा ऊबाठा पक्षाचा भीती मोर्चा आहे. त्या पक्षात अनेक वर्ष श्वास गुदमरला होता. त्यामुळे बोलता आले नाही, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे गटावर टीका केली.

आमच्या नादी लागू नका, अन्यथा…

प्रवक्ता असताना मला कधीही स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार नव्हता. आता मला मोकळेपणे स्वतंत्रपणे बोलता येत आहे. उबाठा गटाच्या चेहरा म्हणून फिरणारे आमच्या देवी देवताची खिल्ली उडवतात. वारकऱ्यांची निंदा करणारे, संत ज्ञानेश्वरांची खिल्ली उडवणारे, बाळासाहेबांची निंदा नालस्ती करणारे शिवसेनेचा चेहरा बनत आहेत. उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना एक स्त्री आहेस मग दुसऱ्या स्त्री बाबत बोलताना जीभ कशी धजावते? आमच्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्या गोधडीची छिद्रे समोर आणावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.