ज्या सत्तेची भीती वाटते ती उलथवलीच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले

| Updated on: Dec 29, 2023 | 1:37 PM

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून सर्वांना पक्षात प्रवेश दिला. मातोश्रीवर हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश झाला. यावेळी खासदार संजय राऊतही मातोश्रीवर उपस्थित होते.

ज्या सत्तेची भीती वाटते ती उलथवलीच पाहिजे; उद्धव ठाकरे यांनी ठणकावले
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 29 डिसेंबर 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ज्या सत्तेची भीती वाटते अशी सत्ता काहीच कामाची नसते. ही सत्ता उलथवूनच टाकली पाहिजे. त्यासाठीच मी उभा आहे. मला फक्त तुमची साथ हवी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं आहे. मातोश्री येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही तोफ डागली. यावेळी शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश झाला. पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, सभापती, माजी सरपंच यांनी मातोश्रीवर येऊन ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांशी संवाद साधत त्यांना शिवबंधन बांधलं. वैशाली पाटील आणि शिंदे गटात असलेले त्यांचे भाऊ, स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून मोठा राजकीय वाद पाहिला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत मानला जात आहे.

पुढील वर्ष लोकशाहीचं जाओ

सर्वजण मातोश्रीत आला आहात. मी तुमचं स्वागत करतो. तुम्ही आता शिवसेनेत काम करणार आहात. पण एक लक्षात घ्या. सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे. त्या जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही सर्वांना आपली वाटली पाहिजे. ज्या सत्तेची भीती वाटत असेल ती उलथवलीच पाहिजे. त्यासाठी आपण काम करत आहोत. त्या कामात तुम्ही सर्व सहभागी होत आहात. तुमचं स्वागत करतो, असं सांगतानाच 1 जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होईल. नव वर्षासहीत पुढील सर्व वर्ष लोकशाहीची जाओ हीच सदिच्छा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

शिवसेना सत्तेवर लाथ मारते

यावेळी खासदार संजय राऊत यांनीही सर्वांचं पक्षात स्वागत केलं. आपल्याकडे पक्ष नाही, चिन्हं नाही. पण आपल्याकडे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्याकडे पाहून लोकं येत आहे. इतर पक्षात प्रवेश सुरू आहेत असं दिसत नाही. फक्त ते आपल्याकडेच सुरू आहे. आपण सर्व उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आलो आहोत. शिवसेना सत्तेवर लाथ मारते. सत्तेची पर्वा करत नाही. शिवसेना ही सत्ता आहे म्हणून कोणतेही निर्णय घेत नाही. म्हणून ती शिवसेना आहे, असं संजय राऊत म्हणाले.