Shiv Sena : बंडखोरांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी, शिवसेनेचे हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना अटक

| Updated on: Aug 03, 2022 | 10:24 AM

एककीकडे थोरात यांना अटक करण्यात आलेली असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे नांदेडचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनीही चिथावणीखोर विधान केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे जे मोठे झाले.

Shiv Sena : बंडखोरांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी, शिवसेनेचे हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना अटक
बंडखोरांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी, शिवसेनेचे हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना अटक
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिंदे गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत  (Uday Samant) यांच्या गाडीवर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे (sanjay more) यांच्यासह शिवसेनेच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ताजी असतानाच बंडखोरांच्या गाड्या फोडण्याची चिथावणी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे हिंगोली संपर्क प्रमुख बबनराव थोरात (babanrao thorat) यांना अटक करण्यात आली आहे. थोरात यांना मुंबईत अटक करण्यात आली आहे. थोरात यांनी भाषण करताना हे चिथावणीखोर विधान केलं होतं. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. थोरात यांना आज कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील हल्ल्याची गंभीर दखल घेतली आहे. या हल्ल्यातील एकाही हल्लेखोरांना सोडण्यात येणार नाही. सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं.

बबनराव थोरात हे शिवसेचे हिंगोली संपर्क प्रमुख आहेत. त्यांनी एका भाषणातून चिथावणीखोर विधान केलं होतं. जिल्हाप्रमुखपदासाठी जे लोक इच्छुक आहेत. त्यांनी त्यांच्या विभागात गद्दारांच्या गाड्या आल्यास त्या फोडून टाका. जो गद्दारांची गाडी फोडेल त्याचा मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल, अशी चिथावणी थोरात यांनी दिली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

गाड्या तर फोडूच पण तोंडाला काळे फासू

एककीकडे थोरात यांना अटक करण्यात आलेली असतानाच दुसरीकडे शिवसेनेचे नांदेडचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनीही चिथावणीखोर विधान केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळे जे मोठे झाले. आमदार झाले आणि गाड्यांमधून फिरू लगाले. त्यांच्या गाड्या फोडण्यात येईल. शिवसेनेत प्रचंड आक्रोश आहे. शिवसैनिकांमध्ये खदखद आहे. आम्ही या गद्दारांच्या गाड्या तर फोडूच पण त्यांच्या तोंडाला काळंही फासू, असा इशाराही पाटील कोकाटे यांनी दिला आहे.

20-25 जणांवर गुन्हे दाखल

दरम्यान, माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी केली अटक आहे. यामध्ये शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांचा समावेश आहे. तसेच सेनेतील 20 ते 25 जणांवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना वैद्यकीय चाचणासाठी नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.