शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. त्या निवडणुकीत महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जोरदार कामगिरी केली. भाजपने १३२ जागा जिंकल्या तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या. एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांची संख्या ४० वरुन ५७ वर नेली. महायुतीला २३० आमदार मिळाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा विश्वास वाढला आहे. त्यांनी आता मुंबई महानगरपालिकेची तयारी सुरु केली आहे. मुंबई मनपामधील 227 वॉर्डांची रणनीती तयार केली जात आहे. मुंबई मनपावर महायुतीचा झेंड फडकवणार, असा विश्वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला. मुंबई पालिकेत सुद्धा महायुतीचे सत्ता आवश्यक आहे. त्या तयारीसाठी नगरसेवक, आमदार, खासदार यांची बैठक घेतली. या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीला महाविजय मिळाला. त्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी घेतलेल्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूक महायुती जिंकेल, त्याच्या तयारीला सुरुवात केल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईत अडीच वर्षात जे काम केले. खड्डे मुक्त मुंबई केली, आरोग्य व्यवस्था चांगली केली, बाळासाहेब दवाखाना सुरु केला या सर्व योजनांमुळे मुंबई मनपात महायुतीचा विजय निश्चित असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बंद पडलेले प्रकल्प सुरू केले, महालक्ष्मी रेसकोर्सवर सेंट्रल पार्क करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. आता मुंबई देशाचे पॉवर हाऊस झाले पाहिजे, त्यासाठी काम करण्याचा संकल्प एकनाथ शिंदे यांनी केला.
महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी बैठक घेतली. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने केलेल्या कामाची पोचपावती मिळाली. त्या कामावर लोक लक्षात ठेव पालिकेत महायुतीला विजय मिळेल. महायुती म्हणून 227 वॉर्डमध्ये आम्ही तयारी करणार आहोत. मुंबईचा विकास कारणे हा आमचा अजेंडा आहे. मुंबईमध्ये गेले अनेक वर्षे खड्डे होते. आता खड्डेमुक्त मुंबई होत आहे. मुंबईत झालेले मेट्रोची कामे, कोस्टल रोज, अटल सेतू ही काम लोक पाहत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
बैठकीत एकनाथ शिंदे म्हणाले, आता सुरक्षित मुंबई महिलांना द्यायची आहे. त्यासाठी ही निवडणूक लढवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितले, मुंबईला आर्थिक कमतरता भासणार नाही. आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. आमच्या वैचारिक भूमिका सारख्या आहेत. त्यासाठी 2022 मध्ये आम्ही निर्णय घेतला आणि सर्व सामान्यांच्या सरकार आले. काही जागा आमच्या किरकोळ फरकाने पडला. जो मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्याला मुंबईत आणण्याचे काम आपल सरकार करणार आहे.