उद्धव ठाकरे अन् संजय राऊत यांना दोन हजार रुपये दंड, काय आहे ते प्रकरण?

| Updated on: Aug 01, 2024 | 2:17 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सदस्य राहुल शेवाळे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. सामनामध्ये छापण्यात आलेल्या एका लेखासंदर्भात हा खटला दाखल केला होता.

उद्धव ठाकरे अन् संजय राऊत यांना दोन हजार रुपये दंड, काय आहे ते प्रकरण?
uddhav thackrey and sanjay raut
Follow us on

मुंबईतील विशेष न्यायालयाने शिवसेना (UBT) नेते आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंड केला आहे. मानहानीच्या खटल्यातील विलंब माफ करण्यासाठी एक हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित दोन हजार रुपये दोन आठवड्यांत जमा करण्याचे आदेश मुंबई सत्र विशेष न्यायालयाने बुधवारी दिले. न्यायालयाने एक हजार रुपयांचा अतिरिक्त दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने दोन हजार रुपये दंड ठोठावून तो दहा दिवसांत जमा करण्याचे आदेश ठाकरे आणि राऊत यांना दिले.

दहा दिवसांत दंड भरण्याचे दिले होते निर्देश

शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्याशी संबंधित खटल्यांच्या सुनावणीच्या विशेष न्यायालयाने जूनमध्ये दोन्ही नेत्यांची याचिका स्वीकारली होती. ज्यात त्यांनी दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुनर्विचार याचिका दाखल करण्यास झालेल्या विलंबाबद्दल माफी मागितली होती. दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना नेते राहुल शेवाळे यांची बदनामी प्रकरणात दोषमुक्तीची याचिका फेटाळली होती. मानहानीच्या दाव्यातून आरोपमुक्त करण्यासाठी या दोघांनी न्यायालयात अर्ज केला होता. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी विलंब झाल्याने दोन्ही नेत्यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला होता.

न्यायालयाने 2,000 रुपयांचा दंड ठोठावला होता. 13 जूनच्या आदेशानुसार शिवसेना (यूबीटी) नेत्यांना दहा दिवसांच्या आत रक्कम भरण्याचे निर्देश दिले होते. ठाकरे आणि राऊत यांनी अधिवक्ता मनोज पिंगळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे की, 2,000 रुपये जमा करण्यास झालेला विलंब अनावधानाने होता आणि त्यासाठी अनेक कारणे नमूद केली होती.

हे सुद्धा वाचा

काय होते प्रकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सदस्य राहुल शेवाळे यांनी ठाकरे आणि राऊत यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. शिवसेनेच्या (यूबीटी) मराठी आणि हिंदी आवृत्तीत बदनामीकारक लेख छापल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ‘सामना’ या मुखपत्रावर कारवाईची विनंती केली आहे.