मुंबईः राज्यातील राजकारण महाविकास आघाडी, शिंदे-फडणवीस सरकार आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या कारणामुळे प्रचंड चर्चेत आले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खासदार संजय राऊत यांच्याकडून वारंवार टीका केली जात आहे. त्याचबरोबर शिंदे गटाच्या आमदारांवर गद्दार आमदार म्हणूनही त्यांच्याकडून प्रचंड टीका केली जात असतानाच शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत हे हास्यापद वक्तव्य करतात अशा टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
खासदार संजय राऊत हे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करतात कारण संजय राऊत यांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांवर टीका करत असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे.
ज्या लोकांना आपले 40 आमदार आणि 13 खासदार सांभाळता आले नाहीत. ज्या प्रमाणे नेते त्यांना सांभाळता आले नाहीत, त्यांना पक्षही सांभाळता आला नाही अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
सातत्याने काम करणारी जुनी जाणते नेते आणि पक्ष नेतृत्व करणारी माणसंही त्यांना सांभाळता आली नाहीत ते या देशाचं नेतृत्व काय करणार असा सवाल नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांना केला आहे.
राजकारणातील सत्तापिपासू वृत्तीमुळे आणि मुख्यमंत्री पदासाठी आपले ज्यांनी आपले विचार सोडले आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जाऊन बसले ते देश काय सांभाळणार आहेत असा घणाघात त्यांनी ठाकरे गटावर केला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याकडून संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.
त्यांनी त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या समोर उद्धव ठाकरे यांचा चेहरा असू शकत नाही आणि मोदींसमोर ते ठक्कर देऊ शकत नसल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.