BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा झटका, माजी नगरसेवकाला अटक, नेमकं प्रकरण काय?

| Updated on: Dec 27, 2022 | 10:23 PM

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना मुंबईतील गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

BMC निवडणुकीआधी ठाकरे गटाला मोठा झटका, माजी नगरसेवकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Image Credit source: social media
Follow us on

गोविंद ठाकुर, मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आलीय. शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी ही खूप वाईट बातमी आहे. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या काही काळात तोंडावर आली असताना ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाला पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. संबंधित माजी नगरसेवकावर खंडणीचे गंभीर आरोप आहेत. याच आरोपांप्रकरणी माजी नगरसेवकाला अटक करण्यात आलीय.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांना मुंबईतील गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने खंडणीच्या आरोपाखाली अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश भोईर यांच्याविरुद्ध समता नगर पोलीस ठाण्यात एका व्यावसायिकाकडून खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

योगेश भोईर यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश भोईर यांच्यावर 386, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश भोईर यांच्या पत्नीने आरोप केला आहे की, पतीला खोट्या प्रकरणात अडकवून अटक करण्यात आली आहे. आपल्या पतीला भेटूही दिले जात नाही, असा असा दावा योगेश यांच्या पत्नीने केलाय.

योगेश भोईरला गुन्हे शाखेच्या पथकाने चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक केल्याचा आरोप करण्यात येतोय.

योगेश भोईर यांचे वकील जयंत पाटील म्हणाले की, “योगेश भोईर यांना अटक करता येणार नाही, असा न्यायालयाचा आदेश आहे. तरीही पोलिसांनी फसवणूक करून समन्स बजावून अटक केली आहे. योगेश भोईर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यांचे पुरावे अद्यापही समोर आलेले नाहीत.”

दुसरीकडे योगेश भोईर यांच्या अटकेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते गुन्हे शाखा युनिट 11 बाहेर घोषणा देताना दिसले.