‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना मेधा सोमय्या यांनी म्हटले की, माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. हा विश्वास आणखी दृढ झाला आहे. कोणी माझ्या परिवार किंवा माझ्या संस्थेवर बेताल वक्तव्य करत असतील तर अजिबात सहन करणार नाही. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्याची प्रक्रिया सुरु केली. त्यावर बोलतान त्या म्हणाल्या, त्यांना जमीन मिळाला तर काय करावे, हे पुढच्या पुढे पाहू या. आता आधी कोर्टाची ऑर्डर मिळू द्या. त्यानंतर पुढे काय करावे त्याचा निर्णय घेता येईल.
न्यायालयाच्या निकालास कालावधी लागला आहे का? त्यावर बोलताना मेधा सोमय्या म्हणाल्या, निकालाबाबत मी समाधानी आहे. तसेच या प्रकरणी कोणतेही राजकीय वक्तव्य करण्यास त्यांनी नकार दिला. मेधा सोमय्या या माटुंगा येथील रुईया कॉलेजमध्ये रसायनशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
मेधा सोमय्या या युवा प्रतिष्ठान नावाची एक संस्था चालवतात. राऊत यांनी 2022 मध्ये त्यांच्यावर 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला. खोटी बिले देऊन पैसे उकळल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्याचे कारण दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केली होती. संजय राऊत या आरोपींच्या पृष्टीसाठी काहीच पुरावे देऊ शकले नाही, त्यामुळे त्यांना न्यायालयाने शिक्षा दिली.