मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाणाची (Dhanushyaban) लढाई केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission) सुरू आहे. शिंदे आणि ठाकरे गटानं जोरदार युक्तिवाद केला. या युक्तिवादावर शिंदे गटानं ठाकरे गटावर दोन मोठे आरोप केलेत. आयोगानं ठोस टिपण्णी केली नाही. आयोगानं पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे. ठाकरे गटाकडून अॅड. कपिल सिब्बल, तर शिंदे गटाकडून जेटमलानी यांनी युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली. पक्षाच्या घटनेला आव्हान देऊ शकत नाही. आमदार पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेत. फक्त लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष नाही.
पक्षात असताना घटनेवर आक्षेप का घेतला नाही. पक्षाचा लाभ घेतला आता लोकशाही नाही म्हणता, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
यावर महेश जेटमलानी यांनी म्हंटलं, पक्षाचा मोठा गट लोकप्रतिनिधींसोबत बाहेर पडल्यास बेकायदेशीर कसा. कपिल सिब्बल म्हणाले, घाईनं निर्णय घेऊ नका. पक्षाच्या धोरणानुसार आमदार-खासदार निवडून येतात. पक्षांतर्गत निवडणुकीसाठी मुदतवाढ द्या.
शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रृटी, अनेक प्रतिज्ञापत्र बोगस आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत प्रतीक्षा करा. चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नका. कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला.
महेश जेटमलानी म्हणाले, आमच्याकडं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळं चिन्हाचा निर्णय तातडीनं घ्या. आमदार, खासदार यांचे बहुमत एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे.
तर कपिल सिब्बल म्हणाले, शिवसेनेतील फुटीचा पक्षावर परिणाम झालेला नाही. शिवसेनेतील फूट म्हणणं कपोलकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. ठाकरे यांची शिवसेना हीचं खरी शिवसेना आहे.
अनिल परब म्हणाले, शिवसेनेचे आमदार, खासदार म्हणजे शिवसेना पक्ष नव्हे. शिवसेना पक्ष घटनेप्रमाणे चालतो. त्यामध्ये निवडणूक असते. कागदपत्रातील त्रृटी निदर्शनात आणून दिलेल्या आहेत.