मुंबई : शिवसेना उपनेते सचिन अहिर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत आलेल्या आदित्य शिरोडकर यांच्याकडे शिवसेनेने महत्त्वाची जबाबदारी दिलीय. स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नियुक्तींचे आदेश दिलेत. यानुसार सचिन अहिर यांची पुणे संपर्कप्रमुख पदावर आणि आदित्य शिरोडकरांची पुणे सहसंपर्कप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आलीय.
मनसेत दीर्घ काळ कामाचा अनुभव असलेल्या आदित्य शिरोडकर यांना ऐन पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पुण्यात जबाबादारी दिल्यानं चर्चांना उधाण आलंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून पुण्यावर भर दिलाय. त्यांच्या पुणे प्लॅनला चेकमेट करण्यासाठीच शिवसेनेने आदित्य शिरोडकरांना पुण्याची जबाबदारी दिल्याचंही बोललं जातंय.
विशेष म्हणजे तरुण आदित्य शिरोडकरांना राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या सचिन अहिर यांची साथ मिळणार आहे. त्यामुळे संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर या नियुक्तीनंतर पुण्यात नेमकी कोणती रणनीती आखताय हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
सचिन अहिर कोण आहेत?
आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना स्वतः आदित्य शिरोडकर सांगतात, “2009 मध्ये जेव्हा नितीन सरदेसाई यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याची संधी दिली गेली. प्रथम मला विचारले गेले परंतु माझ्या वयामुळे मी पात्र नव्हतो (ही निवडणूक अगदी जवळून हाताळली). 2012 मध्ये पुणे कॉर्पोरेशनमध्ये 29 नगरसेवक निवडून आले, तेव्हा मी वडिलांसोबत याचा एक भाग होतो. संपूर्ण महाराष्ट्रात 2014 मध्ये शिक्षण परिषद घेतली. त्यात सध्याची शिक्षण व्यवस्था कशी जुनी झाली आहे आणि सध्याच्या परिस्थितीत तरूणांना तोंड देण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत या विषयावर होती. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या ताज्या धोरणात आम्ही केलेल्या 45 टक्के संशोधनांचा समावेश आहे.”
“2014 मधील लोकसभा निवडणुकीत सुमारे 80,000 मते मिळवली. मुंबईतील मनसे पक्षाबांधणी माझ्या वडिलांनी आणि राज ठाकरेंनी केली होती. प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या शहरात “वर्धापन दिन” साजरा करायचो. माहीम दादर विधानसभेतील दहावी-बारावीमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असतं,” असं त्यांनी नमूद केलंय.
Shivsena gives important designation to Sachin Ahir and Aditya Shirodkar in party