ED, CBI अन् IT अन् भाजप…आदित्य ठाकरे यांनी सांगितले सूत्र काय?

| Updated on: Jan 07, 2024 | 11:16 AM

सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रावर अन्याय आणि अन्यायच सुरु आहे. आता 2024 आपलं सरकार येणार आहे. ज्यांनी ज्यांनी घोटाळा केला ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारचं आहे. मुंबई देशाला चालवते हीच भाजपची पोटदुखी आहे, य़ा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्ला केला.

ED, CBI अन् IT अन् भाजप...आदित्य ठाकरे यांनी सांगितले सूत्र काय?
Follow us on

मुंबई, दि. 7 जानेवारी 2024 | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा मेळावा दक्षिण मुंबईत घेतला. या मेळाव्यातून आगामी निवडणुकांचं रणशिंग आदित्य ठाकरे यांनी फुंकले. या मेळाव्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नव चैत्यन्य निर्माण करतानाच येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधकांनाही चितपट करण्याचा इशारा आदित्य यांनी दिला आहे. यावेळी आपल्या भाषणात बोलताना ‘ही मुंबई आपलीच राहणार हा निश्चय आपण केला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष मुंबईवर असते. मुंबई देशाला चालवते हीच भाजपची पोटदुखी आहे. यामुळे गेल्या 10 वर्षांत एक एक करून सगळं बाहेर घालवला जातंय. महाराष्ट्रावर अन्याय आणि अन्यायच सुरु आहे. आपल सरकार पाडून खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवले. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, असे तुम्हाला वाटते का? असा प्रश्न त्यांनी मेळाव्यात विचारला.

राज्यात विदेशी गुंतवणूक नाहीच

सरकारच्या आकार्यक्षमतेवर आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “एप्रिलमध्ये निवडणुका घेण्याची चर्चा सुरू आहे. आता जाहिरातीमध्ये तेच सगळीकडे तेच दिसतील. प्रत्यक्षात महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक एक रुपयाची आलेली नाही. वेदांता फॉक्सकॉन आपल्याकडे तळेगावला येणार होते. त्यातून 1 लाख लोकांना रोजगार मिळणार होता. हा प्रकल्प राज्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, पण खोके देऊन सरकार पाडलं गेलं. एअरबस, मेडिकल डीवायस पार्क, बलड्रग पार्क, टेसलाही आता गुजरातला चाललय. मग महाराष्ट्रात काय ? महानंदा पण गुजरातला जात आहे. 40 गद्दारही गुजरातला गेले होते. यामुळे हे महाराष्ट्र द्रोही सरकार आहे. बिल्डर पालकमंत्री झालेत, आणि पालिकेत जाऊन बसतायत, असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केलाय .

ED, CBI, IT भाजपचे तीन मित्र पक्ष

देशभरात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपा तपास यंत्रणांचा वापर करत आहे. भाजपचे तीन मित्र पक्ष आहेत. हे तीन मित्र पक्ष म्हणजे ED म्हणजे अमलबजावणी संचालनालय CBI म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग आणि IT म्हणजे आयकर विभाग होय. हे तीन मित्र पक्ष ऑफिसमध्ये येतील आणि त्रास होईल. रोहित पवार यांच्या कार्यालयावर देखील धाड टाकली गेली. भाजपला जिथे जिथे विरोध केला जाईल तिथे तिथे दबाव तंत्राचा वापर होत राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

ही संविधानाची लढाई

संविधानामुळे 75 वर्षांपासून देश पुढे चाललाय. पण आता संविधान बदलायला हे चालले आहेत. त्यांनी दोन पक्ष फोडले, एक परिवार फोडला, धाडी टाकल्या. यातून तुम्हाला मिळतं ? फक्त आणि फक्त “सत्तामेव जयते”, असं म्हणत विरोधकांवर आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. ‘तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हवंय की यांनी लिहिणार संविधान हवंय ? असा प्रश्न उपस्थितांना केला.

2024 ला आपलं सरकार येणार

सरकारच्या भ्रष्टाचारा संदर्भात आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरत इशारा दिला आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी 6 हजार 80 कोटींचा घोटाळा केला आहे. मुंबईचे आयुक्त या घोटाळ्यात आहेत. त्यांना मी सांगतोय त्यांनी सावध रहावं. 2024 आपलं सरकार येणार आहे. ज्यांनी ज्यांनी घोटाळा केला ते जेलमध्ये जाणार म्हणजे जाणारचं. हे लोक महालक्ष्मी रेस कोर्स बिल्डरांना विकायला निघालेत. त्या जागेवर बिल्डर आम्ही घुसू देणार नाही. एक विटही लावू देणार नाही