आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं, ईडीच्या धाडीनंतर 4 दिवसांपासून उपचार

| Updated on: Sep 30, 2021 | 1:39 PM

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अडसूळ चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र त्यांत्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे.

आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं, ईडीच्या धाडीनंतर 4 दिवसांपासून उपचार
आनंदराव अडसूळ
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. अडसूळ चार दिवसांपासून गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र त्यांत्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आहे. आज (गुरुवारी) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांना लाईफलाईन हॉस्पिटलमधून शिफ्ट करण्यात आलं आहे.

आनंदराव अडसूळ यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर 27 सप्टेंबरला ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. ईडीचे अधिकारी चौकशी करत असतानाच आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना लगोलग गोरेगावच्या लाईफलाईन केअरमध्ये अॅडमिट करण्यात आलं. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. आयसीयूमध्ये 4 दिवस उपचार करुनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना आता दुसऱ्या हॉस्पिटमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

ईडीचे अधिकारी पिच्छा सोडेना!

आनंदराव अडसूळ यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये ईडीचे अधिकारी देखील आहे. 4 दिवस उपचारादरम्यान ईडीचे दोन अधिकारी त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्येच होते. त्यांच्या तब्येतीची माहिती ते वारंवार डॉक्टरांकडून घेत होते. आताही दुसऱ्या हॉस्पिटमध्ये नेताना ईडीचे अधिकारी त्यांच्यासोबतच आहेत.

आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीची धाड कशासाठी?

आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत 900 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी 27 सप्टेंबरला त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं होतं. 27 तारखेला सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास ईडीने त्यांना ताब्यात घेतलं.

आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि NPA मध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे. खातेदारांनी अनेक वेळा अडसूळ यांची भेट घेतली पण अडसूळांनी खातेदारांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

आनंद अडसूळ यांच्यावर कोणते आरोप?

आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.

ईडी अडसूळ यांच्यावर कारवाई करेल,राणांना विश्वास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करणार का ?, असा सवाल रवी राणांनी विचारला आहे. सरकार आनंदराव अडसूळ यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अडसूळ यांची केस दाबण्याचा प्रयत्न होत होता, आज ईडीने त्यांना समन्स पाठवलं आहे. ईडी त्यांची चौकशी करेल आणि कारवाई देखील होईल, अशी अपेक्षा आहे, असं रवी राणा म्हणाले.

कोण आहेत आनंदराव अडसूळ?

– आनंदराव अडसूळ हे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार
– 1996 पासून पाच वेळा खासदारकी
– शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांमध्ये अडसूळांचा समावेश
– गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांकडून पराभवाचा धक्का

(Shivsena leader Anandrao Adsul was shifted to another hospital From lifeline hospital Goregaon Mumbai)

हे ही वाचा :

आनंदराव अडसूळ ईडीच्या ताब्यात, तब्येत बिघडल्याने अॅम्ब्युलन्स बोलावली!

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात?, आनंदराव अडसूळ ED कार्यालयात हजर

आनंदराव अडसूळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, सोमय्यांची ED-RBI कडे चौकशीची मागणी