नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये; राऊतांचा सल्ला

| Updated on: Jul 13, 2021 | 10:43 AM

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Nana Patole)

नाना पटोले महत्त्वाची व्यक्ती, त्यांनी फार गांभीर्याने घेऊ नये; राऊतांचा सल्ला
sanjay raut
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले हे महाराष्ट्रातील महत्त्वाची व्यक्ती आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तीचा सुरक्षेचा अहवाल सरकारकडे जातच असतो. त्यामुळे नानांनी फार गांभीर्याने घेऊ नये, असा सल्ला संजय राऊत यांनी नानांना दिला. (shivsena leader sanjay raut reaction on nana patoles statement)

संजय राऊत यांना नाना पटोलेंच्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला असं वाटत नाही. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन विधान केलं असं वाटत नाही. राजकारणात पाळत ठेवणं याचे खूप वेगवेळे संदर्भ असतात. मलाही सरकारची सुरक्षा आहे. त्यामुळे सरकारकडून सुरक्षेची माहिती घेतली जाते. आपण कुठे जातो? काय करतो? कुठे गेल्यामुळे धोका आहे? एखाद्या अतिविशिष्ट व्यक्तिला सुरक्षा दिल्यानंतर त्याची माहिती नेहमी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री घेत असतात. नाना पटोले हे अति महत्त्वाची व्यक्ती आहेत. आज तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे नानांनी या विषयाचं फार गांभीर्याने घेऊ नये. आम्ही सुद्धा घेत नाही. अशी विधानं होत असतात. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्यांनी त्या पद्धतीने काम करावं, असा सल्ला राऊत यांनी दिला.

राणेंची कारकिर्द मोठी

यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. नारायण राणे यांची राजकारणातील कारकिर्द मोठी आहे. तुम्ही त्या अर्थाने घेऊ नका. त्यांची मोठी कारकिर्द आहे. त्या तुलनेत कमी महत्त्वाचं खातं दिलं का? असा माझा प्रश्न होता. तो विषय संपला आता. त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. नक्कीच त्याचा महाराष्ट्राला देशाला फायदा होईल. त्यांचं काही म्हणणं असू द्या. माझा विषय संपला आहे, असंही ते म्हणाले.

तर महाराष्ट्र मोडेल

जरंडेश्वर कारखान्यानंतर राज्यातील सुमारे 40 कारखान्यांची चौकशी होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातील सहकार चळवळ संपवून जर कोणाला आनंद होणार असेल तर ते महाराष्ट्राच्या अकरा कोटी जनतेच्या पोटावर पाय देत आहेत. एवढेच मी सांगेन. राज्याची सहकार चळवळ ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. तो मोडाल तर महाराष्ट्र मोडेल, असा इशाराही त्यांनी दिला. (shivsena leader sanjay raut reaction on nana patoles statement)

 

संबंधित बातम्या:

माझ्या वक्तव्याचा विपर्यास, मनगढत कहाण्या रचून सरकारमध्ये फूट पाडण्याचा डाव; पटोलेंचा भाजपवर वार

नारायण राणे इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ कमिटीवर; वाचा कुणाला मिळाली कोणती कमिटी

शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री शिवबंधन सोडून पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये

(shivsena leader sanjay raut reaction on nana patoles statement)