सत्ता आल्यावर धारावी टेंडर रद्द करणार; उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी घोषणा

| Updated on: Oct 12, 2024 | 8:59 PM

uddhav thackeray Dasara Melava 2024: धारावीकरांना दूर लोटाचं. मिठागरात टाकायचं, असा त्यांचा डाव आहे. परंतु मी धारावीत पोलीसांना जागा देईल मुंबईच्या बाहेर टाकणाऱ्या सर्वांना जागा देईन. गिरणी कामगारांना घरे देईल.

सत्ता आल्यावर धारावी टेंडर रद्द करणार; उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी घोषणा
uddhav thackeray
Follow us on

धारावीच्या माध्यमातून मुंबई लुटत आहे. काय नाही दिलं अदानीला. चंद्रपुरची शाळा दिली, कुर्ला मदर डेअरी, मिठागरे सर्व जागा दिल्या. सब भूमी अदानी की झाली. का आम्ही जगायचं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मुंबई मिळवली. अदानीने आम्हाला मुंबई दिली नाही. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुंबईसाठी लढतोय. तुमच्यासाठी लढतोय. सर्व त्यांना मिळाले तरी लढेल. तुम्ही आहे म्हणून लढणार आहे. आता आपली सत्ता आली तर धारावी टेंडर रद्द करणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना दसऱ्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली.

धारावीत पोलीसांना जागा देईल

मोदी तुम्ही फेक नरेटिव्ह केला. यह लोग मंगळसूत्र निकालेंगे. तुम्ही महाराष्ट्राला लुटून महाराष्ट्राचं मंगळसूत्र देणार आहात का. अदानीच्या हातात माता भगिनींचं मंगलसूत्र देणार नाही. अदानीचं मंगल सूत्र आम्हाला देणार की नाही. आमचं सरकार आल्यावर धारावीचं टेंडर रद्द करणार आहे.  धारावीकरांना दूर लोटाचं. मिठागरात टाकायचं, असा त्यांचा डाव आहे. परंतु मी धारावीत पोलीसांना जागा देईल मुंबईच्या बाहेर टाकणाऱ्या सर्वांना जागा देईन. गिरणी कामगारांना घरे देईल.

एक, दोन महिने थांबा. आमचे सरकार येतंय…

एक, दोन महिने थांबा. आमचे सरकार येतंय. ११ दिवसांत १६०० शासन निर्णय जारी झाले आहे. ही तुमची मस्ती आहे. यातील अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही. जे निर्णय राज्याच्या मुळावर येणार आहे, बिल्डरच्या झोळ्या भरणारे आहेत ते रद्द करूच पण अधिकाऱ्यांना सांगतो या पापात सहभागी होऊ नका. नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकू.

हे सुद्धा वाचा

मुंबई पालिकेची एफडी तोडली. फक्त ४० हजार कोटी राहिले. ते पगारासाठी ठेवावे लागतात, तोडावी लागत नाही म्हणून ठेवली. ९० हजार कोटी उडवून टाकली. पावणे तीन कोटीची वर्क ऑर्डर यांनी काढली,. कोणती कामे. कुणाला दिली. रस्त्यात कुणी खडी टाकली याचीही चौकशी केली. तीन लाख कोटी कुणाला दिले. कोणत्या कंत्राटदाराला दिले त्याची यादी हवी. तीन लाख कोटी तुम्ही राज्याचे उधळून टाकली. राज्य सरकारनेही कर्ज घेण्याची मुदत त्यांनी आज वापरली आहे. डिसेंबरची कर्ज घेण्याची मुदत आज वापरली आहे. तुम्ही कर्ज काढून दिवाळी साजरी करत आहात.