नवी मुंबई : हार्बर लाईनवरील लोकल (Harbour Line Local Service) सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा (Mumbai Local Passengers) झाला आहे. अनेक प्रवाशांना नेमका खोळंबा का झाला, हे काही कळायला ही मार्ग नव्हता. वाशीत सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे पनवेल-सीएसएमटी (Panvel- CSMT Local News) दरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरची वाहतूक कोलमडली आहे. पहाटेच झालेल्या या बिघाडामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्यांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे आता सीएसएमटी ते मानखुर्द आणि पनवेल ते वाशी अशी लोकलसेवा मर्यादित स्वरुपात सुरु ठेवण्यात आल्याच्या सूचना मध्य रेल्वेच्या केंद्रीय सूचना प्रसारणाकडून स्थानकात देण्यात आल्यात. तर ट्रान्स हार्बरवरील सेवादेखील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे ठप्प झाली आहे. यामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्यांचा खोळंबा झालाय.
दरम्यायान, संदर्भातलं ट्विट सेंट्रल रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी केलंय. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करुन विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचंही रेल्वे प्रशासनानं म्हटलंय.
Due to some technical problem in working of signalling system at Vashi station, the following movement is affected from 5.00am.
Down Harbour trains b/w Mankhurd and Panvel are not running.
Trains b/w Thane and Vashi on Trans-Harbor line are not running.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 4, 2022
What is running on Harbour and Trans- Harbour line:
UP Harbour line trains on Panvel-CSMT/Goregaon are running.
Thane -Nerul/Panvel- Thane section trains are running.
All efforts are being taken to restore the traffic on affected line.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) May 4, 2022
सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मानखुर्द ते पनवेल दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. याचा फटका हार्बर मार्गावरील रेल्वेच्या वेळा पत्रकाला बसला. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. तर ट्रान्स हार्बर मार्गावरीलही वेळापत्रक सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे कोलमडलं. ठाणे ते वाशी दरम्यानची लोकल सेवाही ठप्प झाली होती.
दरम्यान ट्रान्स हार्बरवरील ठाणे ते नेरळ आणि ठाणे ते पनवेल ही लोकलसेवा सुरु असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, आता या लोकल सेवेवर ताण येण्याची शक्यता आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे प्रवाशांना आता वळसा घालून ठाणामार्गे प्रवास करावा लागणार आहे.