मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या (sharad pawar) मुंबईतल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा गृहखात्यावर प्रश्नचिन्हं निर्माण करण्यात आलं. विरोधकांबरोबरच खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील पोलीस कुठं होते?, असा सवाल उपस्थित केला. तर मीडियाला माहिती मिळाली मग पोलिसांना का नाही? असा सवाल खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केला होता. पोलीस कमी पडले, हे अजित पवारांनीही जाहीरपणे सांगितलंय. गुरुवारी हायकोर्टाचा एसटीच्या संपावर निकाल आला. कर्मचाऱ्यांनी त्या निर्णयाचं स्वागतही केलं. त्यानंतर शुक्रवारी जवळपास 3 वाजून 20 मिनिटांनी संपकरी सिल्व्हर ओक निवासस्थानी आले होते. त्यावेळी पवारांच्या निवासस्थानी 2 ते तीनच पोलीस कॉन्स्टेबल होते. दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी म्हणजेच 20 मिनिटांनंतर पोलीस फौजफाट्यासह सिल्व्हर ओकवर आले. त्या 20 मिनिटांत आंदोलकांनी पवारांच्या निवासस्थानाला घेराव घालत चप्पलफेक करुन घोषणाबाजी सुरु केली होती. आता या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे.
सिल्व्हर ओक प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील संभाषण काय होतं? दोन आरोपींचं हेच संभाषण उघड झालंय. या दोघांमधील संभाषण वाचा…
( ए -अभिषेक पाटील आणि बी- संदीप गोडबोले)
अभिषेक : हॅल्लो
संदीप गोडबोले : बोल अभिषेक
ए – तिथेच जाऊ का?
बी – हा तिथेच जायचे
ए – आम्ही बंगल्याच्या तिथे चपला सोडल्या. आम्ही लवकर आलो. आम्ही फोटो पण काढलेत. तिथे आता लोक लय आले. काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब. करावं तर सगळं आपणच करावं. बाकीचे निवांत बसावे. इथे येऊन साहेबाना लगेच सांगितलं. मुदलियार पाटील आताच आले. आता रात्रभर मैदान आहे. सकाळी 9 पर्यंत अंघोळ करून पण येऊ नये का.
बी – आता कुठे आहात तुम्ही…
ए – इथे सगळ्या महिला घेतल्यात डायरेक्ट. त्यांना तिकीटाला पैसे दिलेत. तिकीट काढलेत निघालेत. 70 ते 80 महिला आणि माणसं 100 -200
बी – महालक्ष्मी पेट्रोल पंप कुठे आहे विचारा
ए – बर पेट्रोल पंपावर ना – मीडिया आली
बी – मीडिया आली आहे.
ए – चला मीडिया आली भाऊ
बी – हो
हे वरील संभाषण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हल्ला करण्यात आला होता. त्यामधील हल्लेखोर आरोपींचे आहे.
इतर बातम्या
पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, सलग 9 व्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर
Mahavir Jayanti 2022: जगाला पंचशील तत्त्व देणारे महावीर, जाणून घ्या महावीरांची तत्त्वे
Health : उन्हाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी अशाप्रकारे काळजी घेणे आवश्यक, या टिप्स फाॅलो करा!