मुंबई – मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) प्रत्येक पोलिस स्थानकामध्ये ध्वनी प्रदूषणासंदर्भात एका पोलिस निरीक्षकाची यासंदर्भात नेमणूक केलेली आहे. सदर ध्वनी प्रदूषणाची तक्रार नेमणूक केलेल्या पोलीस निरीक्षकाला (Inspector of Police) नागरिक देऊ शकतात. सण उत्सवाच्या काळात जोरजोरात ढोल वाजवणे व डॉल्बी साऊंड सिस्टीमवरून (Dolby sound system) उच्च आवाजात गाणी लावणे. मोठ्या आवाजाचे फटाके वाजवणे यामुळे ध्वनी प्रदूषण होत असते. ध्वनी प्रदूषणामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असतो. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे राज्य सरकारला तात्काळ हटवण्याचे दिले.
सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण संरक्षणाचा कायदा सन 1986 व ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 मधील तरतूदींचे सक्त पालन करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानूसार रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये वाजविण्यास सक्त बंदी केलेली आहे. तसेच सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुध्दा लाऊड स्पीकर, फटाके, वाद्ये इत्यादी मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.
ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण सन 2000 चे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा 1986 कलम 15 प्रमाणे 5 वर्षे कैदेची किंवा एक लाख रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच शिक्षा होऊन सुध्दा असे गुन्हे चालू ठेवल्यास पुढील प्रत्येक दिवसाला पाच हजार रूपये दंडाची तरतूद आहे. तसेच कलम 15 (1) प्रमाणे शिक्षा लागल्याचे 1 वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असे गुन्हे केल्यास 7 वर्षे पर्यंतची शिक्षा होऊ शकते.