नोव्हेंबर महिन्यात एसटीला विक्रमी धनलाभ, उत्पन्नाचा नवीन टप्पा पार

| Updated on: Dec 23, 2023 | 11:56 AM

st bus news | एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बसेस आल्या आहेत. एसटीने स्लीपर कोच सुरु केली आहे. नवीन गाड्यांची खरेदी केली जात आहेत. प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी अधिक सुविधा दिल्या जात आहेत. यामुळे एसटीचे उत्पन्न वाढत आहेत. नोव्हेंबर महिन्यात एसटीचे उत्पन्न ९१५ कोटींवर गेले आहे.

नोव्हेंबर महिन्यात एसटीला विक्रमी धनलाभ, उत्पन्नाचा नवीन टप्पा पार
ST BUS
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

रवी खरात, मुंबई, दि.23 डिसेंबर | राज्य परिवहन महामंडळाची एसटी गावागावात आणि शहराशहरात पोहचली आहे. काळाप्रमाणे एसटी बदलत चालली आहे. एसटी प्रवास अधिक आरामदायी होण्यासाठी परिवहन महामंडळाकडून प्रयत्न सुरु आहेत. एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रीक बसेस आल्या आहेत. एसटीने स्लीपर कोच सुरु केली आहे. नवीन गाड्यांची खरेदी केली जात आहेत. प्रवाशांना एसटीकडे आकर्षित करण्यासाठी अधिक सुविधा दिल्या जात आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहे. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढत आहे. विविध सवलती दिल्यानंतरही नोव्हेंबर महिन्यात एसटीने उत्पन्नाचा विक्रम केला आहे. एकाच महिन्यात ९१५ कोटींचे उत्पन्न एसटीला मिळाला आहे.

एसटीला नोव्हेंबरमध्ये ९१५ कोटींचे उत्पन्न

गेल्या १९ महिन्यांपैकी यंदाच्या नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक फायद्याच्या एसटीसाठी ठरला आहे. या महिन्यांत दिवाळीच्या सुट्यांमुळे एसटीच्या तिजोरीत ९१५ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या महिन्यात महामंडळाने भाडेवढ केली होती. दिवाळीमुळे एसटीने दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. सुट्टीच्या कालावधीत लांब पल्यांच्या मार्गावरील प्रवासी वाहतूक एसटीने वाढवली होती. जादा बसेस सोडल्या होत्या. या काळात एसटीच्या ताफ्यात नव्या गाड्याही आल्या होत्या. यामुळे नोव्हेंबर महिन्यात एसटीचे रोजचे सरासरी उत्पन्न ३० कोटींपेक्षा जास्त झाले आहे. एसटीने आता क्यूआर कोडची सुविधाही सुरु केली आहे. यामुळे खिशात पैसे नसतानाही एसटी प्रवास करता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

एसटीत अनेक सवलती

एसटीमध्ये सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50 टक्के सूट दिले जाते. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सवलत दिली जाते. ज्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवाशाची सुविधा आहे. सामाजिक जाणीव लक्षात घेऊन दिव्यांग व्यक्तींना एसटी प्रवासात सवलत आहे. पत्रकारांनाही एसटी प्रवासात सवलत दिली जाते. विविध सवलती देऊनही एसटीकडून उत्पन्नाचा विक्रमी टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठांना मोफत प्रवासाच्या या सवलती सर्व सेवांसोबतच शिवनेरी बस सेवेसाठी देखील लागू असणार आहे. यामुळे राज्यभरातील लाखो लोकांना फायदा झाला आहे.