मुंबई: 31 ऑगस्ट2022 रोजी श्री गणरायाचे (Ganpati Bappa) आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालंय. यंदा कोरोना (Corona) संकटानंतर प्रथमच चाकरमान्यांना गावी जाण्याची संधी मिळणारे. एसटी महामंडळाने यंदा गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 25ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान या जादा गाड्या चालविण्यात येणार असून 25 जूनपासून त्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ॲड. परब यांनी केले आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती सणासाठी चाकरमानी वर्षभरापासून प्लॅनिंग करत असतात. त्यामुळे अडीचशे बसेस यंदा सोडण्यात येणार असून 25 जूनपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल.
25 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान या गाड्या कोकणात रवाना होतील, तर 5 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरदरम्यान परतीच्या गाड्या निघतील. या बसेसचे आरक्षण बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेतस्थळावर मोबाईल येणार आहेत. ॲपद्वारे, खासगी बुकिंग एजंटकडे उपलब्ध होणार आहे, असेही ॲड. परब यांनी सांगितले. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बस स्थानक व बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात