ST Workers Strike : एसटी चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाचा किती पगार वाढणार?, वाचा एका क्लिकवर

| Updated on: Nov 24, 2021 | 10:27 PM

सटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत कोर्टाने नेमलेल्या समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. असं असलं तरी संपकरी एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, परबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटीतील चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाला किती पगारवाढ झाली हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

ST Workers Strike : एसटी चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाचा किती पगार वाढणार?, वाचा एका क्लिकवर
एसटी विलीनीकरणावर सुनावणी शुक्रवारी
Follow us on

मुंबई : मागील 15 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला यश आलं आहे. सरकारने एक पाऊल पुढे येत एसटी कर्मचाऱ्यांची पगारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीबाबत कोर्टाने नेमलेल्या समितीच्या अहवालानंतरच घेण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. असं असलं तरी संपकरी एसटी कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, परबांनी केलेल्या घोषणेप्रमाणे एसटीतील चालकापासून ते लिपिकापर्यंत कुणाला किती पगारवाढ झाली हे जाणून घेणं महत्वाचं आहे. (How much will the salary of ST drivers, Conductors, mechanics and clerks be increased?)

चालकाच्या पगारात एकूण किती रुपयांची वाढ ?

नवनियुक्त चालक – सध्याचे स्थूल वेतन 17 हजार 395 रुपये. त्यात आता 7 हजार 200 रुपयांची वाढ, सुधारित स्थूल वेतन आता 24 हजार 595 रुपये.

10 वर्षे पूर्ण झालेला चालक – सध्याचे स्थूल वेतन 23 हजार 40 रुपये. त्यात आता 5 हजार 760 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 28 हजार 800 रुपये.

20 वर्षे पूर्ण झालेला चालक – सध्याचे स्थूल वेतन 37 हजार 440 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 41 हजार 40 रुपये.

30 वर्षे पूर्ण झालेला चालक – सध्याचे स्थूल वेतन 53 हजार 280 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 56 हजार 880 रुपये.

 

वाहकाच्या पगारात एकूण किती रुपयांची वाढ ?

नवनियुक्त वाहक – सध्याचे स्थूल वेतन 16 हजार 99 रुपये. त्यात आता 7 हजार 200 रुपयांची वाढ, सुधारित स्थूल वेतन आता 23 हजार 299 रुपये.

10 वर्षे पूर्ण झालेला वाहक – सध्याचे स्थूल वेतन 21 हजार 600 रुपये. त्यात आता 5 हजार 760 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 27 हजार 360 रुपये.

20 वर्षे पूर्ण झालेला वाहक – सध्याचे स्थूल वेतन 36 हजार रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 39 हजार 600 रुपये.

30 वर्षे पूर्ण झालेला वाहक – सध्याचे स्थूल वेतन 51 हजार 880 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 55 हजार 440 रुपये.

 

यांत्रिकीच्या पगारात एकूण किती रुपयांची वाढ ?

नवनियुक्त यांत्रिकी – सध्याचे स्थूल वेतन 16 हजार 99 रुपये. त्यात आता 7 हजार 200 रुपयांची वाढ, सुधारित स्थूल वेतन आता 23 हजार 299 रुपये.

10 वर्षे पूर्ण झालेला यांत्रिकी – सध्याचे स्थूल वेतन 30 हजार 240 रुपये. त्यात आता 5 हजार 760 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 36 हजार रुपये.

20 वर्षे पूर्ण झालेला यांत्रिकी – सध्याचे स्थूल वेतन 44 हजार 496 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 48 हजार 96 रुपये.

30 वर्षे पूर्ण झालेला यांत्रिकी – सध्याचे स्थूल वेतन 57 हजार 312 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 60 हजार 912 रुपये.

 

लिपीकाच्या पगारात नेमकी किती वाढ ?

नवनियुक्त लिपीक – सध्याचे स्थूल वेतन 17 हजार 726 रुपये. त्यात आता 7 हजार 200 रुपयांची वाढ, सुधारित स्थूल वेतन आता 24 हजार 926 रुपये.

10 वर्षे पूर्ण झालेला लिपीक – सध्याचे स्थूल वेतन 24 हजार 768 रुपये. त्यात आता 5 हजार 760 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 30 हजार 528 रुपये.

20 वर्षे पूर्ण झालेला लिपीक – सध्याचे स्थूल वेतन 38 हजार 160 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 41 हजार 760 रुपये.

30 वर्षे पूर्ण झालेला लिपीक – सध्याचे स्थूल वेतन 53 हजार 280 रुपये. त्यात आता 3 हजार 600 रुपयांची वाढ. सुधारित स्थूल वेतन 56 हजार 880 रुपये.

इतर बातम्या :

मोठी बातमी ! एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठ्या पगारवाढीची घोषणा, जाणून घ्या, कोणत्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार नेमका किती हजारानं वाढला ?

ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात फुट पडणार? गुणरत्न सदावर्ते येताच आझाद मैदानावर जोरदार घोषणाबाजी

How much will the salary of ST drivers, Conductors, mechanics and clerks be increased?