कोश्यारी यांचा उत्तराधिकारी कोण? नव्या राज्यपालाबाबत भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे विधान

| Updated on: Jan 29, 2023 | 3:06 PM

महाराष्ट्रात अनेक वादामुळे चर्चेत राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी सुमित्रा महाजन यांचे नावही चर्चेत आले होते. परंतु आता त्यांनी याबाबत स्वत: खुलासा केला आहे.

कोश्यारी यांचा उत्तराधिकारी कोण? नव्या राज्यपालाबाबत भाजपच्या बड्या नेत्याचे मोठे विधान
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi ) यांना पत्र लिहिले. त्यात त्यांनी राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. त्यांच्या या पत्रानंतर महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालाबाबत चर्चा सुरु झाली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) , राजस्थानचे राज्यपाल व उत्तर प्रदेशातील भाजप नेते कलराज मिश्रा यांचे नाव चर्चेत आली आहेत. आता भाजपच्या एका बड्या नेत्याने जाहीरपणे राज्यपाल होण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण असणार?, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी एका मुलाखतीत महाराष्ट्राच्या राज्यापाल होण्यास तयार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘देशातील तिसऱ्या क्रमांकाचे लोकसभा अध्यक्ष हे पद मी भूषवलेले आहे. त्यामुळे आता मनात माझ्या मनात कोणतीही इच्छा राहिलेली नाही. वयामुळे आता ताकदही राहिलेली नाही. परंतु पक्षाने पालक म्हणून पाठवले तर महाराष्ट्रात जाईल. त्यामुळे पार्टीला सांगा आणि मला महाराष्ट्राचे पालक करा.’

महाराष्ट्रात अनेक वादामुळे चर्चेत राहिलेले भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी सुमित्रा महाजन यांचे नावही चर्चेत आले होते. परंतु आता त्यांनी याबाबत स्वत: खुलासा केला आहे.

हे सुद्धा वाचा

या नावांची चर्चा

भाजपचे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश माथूर यांचेही नाव चर्चेत आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचे प्रभारी आणि ते भाजपचे सरचिटणीस या पदावरही ते राहिले आहेत.

अमरिंदर सिंह यांचे नाव चर्चेत का?

अमरिंदर सिंग १९७७ मध्ये पहिल्यांदा काँग्रेसमधून खासदार झाले. १९८४ मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. १९९९ मध्ये पु्न्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून दोनदा मुख्यमंत्री झाले. २०२१ ला मुख्यमंत्री पदावरून हटविल्यानंतर पुन्हा काँग्रेसला रामराम ठोकला. अमरिंदर सिंग यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांशी चांगले संबंध आहेत.